News Now
Home > चंद्रपूर > खळबळजनक :- महापौर राखी कंचर्लावार यांच्या पती आणि दिरांची साई हेरीटेज इमारत सुद्धा बेकायदेशीर ?

खळबळजनक :- महापौर राखी कंचर्लावार यांच्या पती आणि दिरांची साई हेरीटेज इमारत सुद्धा बेकायदेशीर ?

 

साई सुमन डेव्हलपर नावाने दोन मजली इमारतीची मंजुरी, मात्र पदाचा गैरवापर करून पुन्हा एक मजल्यांचे अवैध बांधकाम पार्किंगच्या जागेवर गाळे बांधून विकले ..

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – ११

चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या पतीने व त्यांच्या नातेवाईकांनी चंद्रपूर शहरात पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून व बेकायदेशीर मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून भूखंड माफिया अशी नवी ओळख निर्माण केल्याचे जाहीर होत असतानाच आता तर संजय कंचर्लावार यांच्या चक्क वरोरा नाक्याजवळील साई हेरीटेज ह्या इमारतीचे बांधकाम सुद्धा बेकायदेशीर असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या साई हेरीटेज इमारतीची बांधकाम मंजुरी साई सुमन डेव्हवलपर्स नावाने नगरसेवक संजय कंचर्लावार व जनार्दन मेडिकल चे संचालक ज्यांनी जेटपुरा सराई मार्केट ची जागा हडपली ते दत्तू कंचर्लावार दोन संचालकांना मिळाली खरी पण ती मंजुरी केवळ दोन मजल्यांची होती व मंजूर नकाशा नुसार खाली पार्किंग ची जागा राखीव करण्याचे दर्शविण्यात आले होते पण नगरसेवक पदाचा गैरवापर करून त्यांनी पार्किंग च्या जागेवर गाळे तयार करून कोट्यावधी तर कमावलेच शिवाय वरचा मजला सुद्धा बांधून पालिकेच्या मंजूर प्लानची पण ऐशीतैशी केली त्यामुळे आता महापौर राखी कंचर्लावार व त्यांचे पती संजय कंचर्लावार दोघेही अडचणीत सापडले असून त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते पण ही बाब प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांना का खटकत नाही ? हा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे.

खरं तर या प्रकरणात माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या आशीर्वादानेच राखी कंचर्लावार ह्या महापौर झाल्या आणि जर राखी कंचर्लावार यांच्यावर आरोप लागत आहे तर ते आरोप निश्चितपणे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सुद्धा जाते पण आश्चर्याची बाब म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे कुठल्या चक्रव्यूहात फसले आहे ? हेच कळायला मार्ग नसून जर महापौर राखी कंचर्लावार आणि नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या विरोधात बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी झाली तर ती गोष्ट भाजप च्या सत्तेला घातक ठरणारी आहे.एकूणच आता कंचर्लावार कुटुंबीयांचे शहरात अवैध बांधकाम भाजप पक्षाला घेवून बुडणार असेच एकूण चित्र असून संजय कंचर्लावार यांचे पुन्हा काही बांधकामे बेकायदेशीर असल्याच्या माहिती खुद्द जनतेकडून प्राप्त असल्याने येणाऱ्या काळात काय घडामोडी घडेल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

 

Leave a Reply

Top