एसबीआय ग्राहक सेवा केंद्राच्या एजंट कडून बोर्डा चौकातील ग्राहक केंद्रात येण्याचे ग्रामीण जनतेला आवाहन. अशा एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.
वरोरा प्रतिनिधी :-
बोर्डा चौकात लॉक डाऊनच्या मागील अनेक महिन्यापासून एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात तुफान गर्दी सुरू आहे, ग्रामीण व शहरी महिलांची इथे मोठी उपस्थिती नेमकी कशामुळे आहे हे बघितले तर पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत प्रत्त्येक व्यक्तींच्या बैंक खात्यात ५००/- रुपये मिळेल या आशेने लोक जनधन योजनेचे खाते काढण्यासाठी गर्दी करीत करीत आहे. आता कोरोनच्या या माहामारीत एकीकडे जनता रोजगार गेल्याने व कामधंदा बंद झाल्याने त्रस्त असून शेतीमध्ये सुद्धा आता सोयाबीन आणि कपाशी वर रोगराई आल्याने हवालदिल झालेली असताना आता त्या जनतेला जनधन योजनेचे ५०० रुपये मिळणार म्हणून प्रत्तेकी ३० रुपये घेवून फसवणूक करण्याचे काम एसबीआय बैंक ग्राहक सेवा केंद्राचे एजंट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे एजंट गावा गावात जाऊन जन – धन योजनेच्या नावाखाली तुमच्या अकाऊटमधे ५०० रुपये महिन्याचे मिळनार अशी खोटी प्रलोभने देउन ३० – ३० रुपये घेऊन फॉर्म भरुन घेत आहेत. व ग्राहकांना बोर्डा चौकातील ग्राहक सेवा केंद्रात बोलवीत आहे. खरं तर कोरोनाच्या महामारीमुळे सरकारी यंत्रणा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतीत आहे व त्यासाठी लॉक डाऊन करून जनतेला या कोरोना पासून काळजी घेवून दक्ष राहण्याचे आव्हान करीत आहे तर दुसरीकडे एसबीआय बैंक ग्राहक सेवा केंद्राचे एजंट जिथे जनधन योजनेसाठी ग्राहकांकडून कुठलेही पैसे घेण्याचे आदेश नसताना गावा गावात जाऊन जन – धन योजनेच्या नावाखाली लोकांना एकत्र करतात व त्यांच्याकडून प्रत्तेकी ३०/- रुपये घेतात ही एक फसवणूक असून या एसबीआय अशा एजंट वर आपत्ती व्यवस्थापन व महामारी कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.