News Now
Home > चंद्रपूर > बिलाल कालनी व परिसरातील विद्युतीकरणासाठी १९ लाख देण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचे आश्वासन

बिलाल कालनी व परिसरातील विद्युतीकरणासाठी १९ लाख देण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचे आश्वासन

सामजिक कार्यकर्ते तथा कट्टर काँग्रेस कार्यकर्ते हारूण भाई यांच्या प्रयत्नांना यश, काँग्रेस कामगार जिल्हाध्यक्ष छोटूभाई शेख, इरफान शेख,मोसिन पठाण शब्बीर भाई यांची निवेदन देतांना उपस्थिती. 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर येथील बिनबा गेट परिसरात बिलाल कालनी मधे गोरगरीब मुस्लिम नागरिक राहत असून तिथे विद्युत लाईनची व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे, याकडे चंद्रपूर महानगर पालिका पण दुर्लक्ष करीत होते शिवाय महावितरण कंपनीने सदर भागात इलेक्ट्रिक लाईन व मीटर संदर्भात जवळपास १९ लाख रुपयाचे अंदाजपत्रक सांगितले असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा यक्ष प्रश्न येथील गरीब मुस्लिम परिवारांना पडला असताना सामजिक कार्यकर्ते हाजी हारूण भाई यांनी सदर प्रकरण काँग्रेसचे कामगार जिल्हा अध्यक्ष छोटूभाई यांना लक्षात आणून देताच त्यांनी या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सदर डीपीडीसी योजनेतून निधी ची मागणी केल्यास हा प्रश्न आपण सोडवू शकतो असा सल्ला दिला व लगेच एक शिष्टमंडळ पालकमंत्री यांना जावून भेटले असता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ या समस्या निवारण करण्यासाठी १९ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आणि हा निधी काही दिवसातच महावितरण कंपनी ला वितरित करण्यात येईल याचे आश्वासन दिले त्यामुळे हारूण भाई यांच्या पाठपुराव्यांला यश आल्याने बिलाल कॉलनी परिसरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी हारूण भाई, छोटू भाई, इरफान शेख,मोसिन पठाण, प्रमोद बोरीकर,शब्बीर भाई यांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देतेवेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Top