Home चंद्रपूर धक्कादायक :- स्वतःच बांधकाम तोडण्याचे आदेश देणाऱ्या सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे स्वतःच्या...

धक्कादायक :- स्वतःच बांधकाम तोडण्याचे आदेश देणाऱ्या सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे स्वतःच्या आदेशाचीच माहिती विसरल्या ?

 

चंद्रपूर मनपामधे सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात विरोधी पक्षातील नगरसेवक कधी बंड करून उठणार ? की छंड बनून राहणार ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग -१५

चंद्रपूर मनपा जेव्हापासून भाजप सत्ताधारी यांच्या कब्जात आली तेव्हापासून जणू या मनपा प्रशासनाला भ्रष्टाचारांची वाळवी लागली आहे की काय? हेच कळत नाही.त्यातच महापौर कंचर्लावार झाल्या तेव्हापासून भ्रष्टाचाराला पुन्हा उधाण आले आहे, त्यातच सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे ह्या अशा अधिकारी आहेत की ज्यानी  मनमानी कारभार करायचा  व सत्ताधारी यांच्या इशाऱ्यांवर कुणाचेही बांधकाम तोडायचे आणि ज्या बांधकामाना तोडण्याचे आदेश चक्क तहसीलदार व न्यायालयाचे आहे ते वाचवायचे असा यांचा नित्यक्रम चालला आहे. ह्या सत्ताधारी यांनी आदेश देताच लगेच सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घराचे बांधकाम तोडण्यासाठी फौजफाटा घेवून जातात, नरेंद्र गेडाम चे बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचे आदेश तहसीलदार यांचे असताना त्यांचे पाडण्याचे सोडून चक्क त्याच नरेंद्र गेडाम च्या तक्रारी वरून स्वतःच्या अधिकृत जागेवर विटाचे वॉल कंपाउंड़ करणाऱ्या शामराव गेडाम चे बांधकाम कुठलीही पूर्व सूचना न देता पाडतात मात्र शामराव गेडामने माझे बांधकाम पाडण्याचे आदेश कुणी दिले ? बांधकाम तोडले त्यावेळी पंचनामा झाला का? याची माहिती विचारल्यानंतर त्यांनी अशी कुठलीही माहिती नसल्याचे पत्र देवून स्वतःच्याच आदेशाची माहिती विसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शामराव गेडाम यांचे सिव्हील लाईन वार्ड नं.१, मुख्य बस स्थानकचे मागे मागील ४० वर्षापासून नझुल च्या जागेवर बांधकाम आहे व त्याची मनपा मधे असेसमेण्ट कॉपी पण आहे मात्र त्यांच्या घरासमोर असलेल्या खोब्रागडे यांची जागा नरेंद्र ढेकलु गेडाम यांनी नोटरी करून विकत घेतली, मात्र या जागेची दोन वेळा एकच किंमत असलेली मात्र दोन वेगवेगळे जमिनीची आराजी असलेली विक्री दाखवून खोट्या सह्या व नरेंद्र गेडाम यांनी प्रशासनाची दिशाभूल केली नव्हे खोट्या सह्या व खोटे दस्तऐवज जोडून महानगर पालिकेत कर पावती स्वतःच्या नावे केली आणि दोन मजली बेकायदेशीर इमारत बांधली विशेष म्हणजे नरेंद्र ढेकलु गेडाम यांनी शामराव गेडाम च्या जवळपास ३०० चौरस फूट जागा सुद्धा कब्जात घेतली व त्या जागेवर सुद्धा बांधकाम केले. या संदर्भात शामराव गेडाम यानी जिल्हाधिकारी आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी देवून नरेंद्र गेडाम यांचे बेकायदेशीर बांधकाम तोडण्याची मागणी केली होती व तत्कालीन तहसीलदार शिंदे यांनी नरेंद्र गेडाम यांचे नझुल च्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून अवैध बांधकाम केले ते तोडण्याचे आदेश दिले होते, पण महानगर पालिकेत असलेला भ्रष्ट कारभार आणि विकल्या जाणारे सत्ताधारी यामुळेच तहसीलदार यांचा आदेश असताना सुद्धा मनपा ने ते बांधकाम तोडले नाही तर उलट नरेंद्र गेडाम यांची पाठराखण करून बिचाऱ्या शामराव गेडाम यांनी स्वतःच्या जागेवर विटाचे वॉल कंपाउंड़ बांधकाम केले त्या विरोधात अगोदरच बेकायदेशीर बांधकाम असलेल्या नरेंद्र गेडाम यांच्या तक्रारी वरून शामराव गेडाम यांचे विटाचे वॉल कंपाउंड़ सहाय्यक आयुक्त शितल वाकडे यांच्या आदेशाने पाडण्यात आले जेंव्हा की शामराव गेडाम यांना कुठलाही नोटीस व पूर्वसूचना न देता व ते हजर नसताना बांधकाम तोडले,

महत्वाची बाब म्हणजे नझुल च्या जागेवरील कुठलेही बांधकाम तोडण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना असताना त्यांचा आदेश नसताना सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे यांनी कुठल्या अधिकाराखाली ते तोडले? म्हणून शामराव गेडाम यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत ही माहिती सहाय्यक आयुक्तांना मागितली असता त्यांनी शामराव गेडाम यांनी मला काहीही सुचना हजर राहण्याबाबत न सांगता कारवाई करण्यात आली. हा आदेश कुणाचा आहे. पंचनामा झाला का ? यावेळी कोण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ही माहिती मागितली असता चक्क स्वतः माहिती अधिकारी असलेल्या शीतल वाकडे यांनी अहवालात कार्यालयीन अभिलेखाची पडताळणी केली असता माझ्या गैरहाजरीमध्ये मनपाच्या अतिक्रमण दस्त्याने सदरबाबतची माहिती आढळुन आलेली नाही. फुलाच्या कुंड्या तसेच वॉल कम्पाऊंडची तोडफोड झाली किंव्हा कसे ही माहिती नाही त्यामुळे, सदरबाबत आपणास माहिती पुरविता येऊ शकत नाही असे म्हटले आहे.

म्हणजे स्वतःच बांधकाम तोडण्याचे बेकायदेशीर आदेश द्यायचे आणि जेंव्हा त्याबद्दल माहिती मागितली तर चक्क आपल्याच आदेशाची व तोडण्याच्या कारवाईची माहिती न देणे म्हणजे सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे ह्या कशाच्या बळावर कारवाई करतात ? हेच कळायला मार्ग नाही त्यामुळे महानगर पालिका ज्या एकछत्री राज्य करणाऱ्या भ्रष्ट समूहात विलीन आहे तोपर्यंत इथल्या सर्वसामान्य लोकांच्या बांधकामाला तोडण्यात येईल आणि ज्यांच्याकडे पैसा आहे आणि सत्ता आहे त्यांचे बेकायदेशीर बांधकाम हे मनपा प्रशासन तोडणार नाही, पण आश्चर्याची बाब म्हणजे मनपा च्या सभागृहात जे विरोधी बाकावर नगरसेवक बसले आहे ते बंड न करता छंडासारखे गप्प का बसले आहे ? का या मनपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कुणीच आवाज उठविणार नाही ? मग जनतेने तुम्हाला त्यांच्या अधिकाराचे सरक्षण व त्यांच्या सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी मनपा सभागृहात पाठवले त्याचे काय ? त्याचा हिशोब कोण देणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here