Home वरोरा पोलिस डायरी :- दारूतस्कर पिंटूचा पाठीराखा कोण…? वरोरा पोलिसांनी का घेतलय झोपेचं...

पोलिस डायरी :- दारूतस्कर पिंटूचा पाठीराखा कोण…? वरोरा पोलिसांनी का घेतलय झोपेचं सोंग?

 

एलसीबीची चंद्रपूर वरून येवून दारू तस्करावर कारवाई मग वरोरा पोलिसांची चुप्पी का ?

वरोरा प्रतिनिधी :-

शहरात अल्पावधीत दारुतस्करीच्या मैदानात प्रसिद्ध झालेला पिंटू उर्फ अनिलसिंग जुनी याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरात अवैध दारू विक्रीचे मोठे जाळे पसरविले आहे. रोज लाखोच्या दरात अवैध दारुसाठा शहरात बिंदास उतरवून उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दारू तस्करी केल्या जात आहे. मात्र स्थानिक वरोरा पोलिसांकडून दारू तस्कर पिंटू वर कुठलीही कारवाही होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. चिल्लर विक्रेत्यांवर कारवाई करणारे वरोरा पोलीस दारू तस्कर पिंटू च्या बाबतीत मुंग गिळून गप्प का ? याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. काही दिवसापूर्वी चंद्रपूर एलसीबी ने दारू तस्करी करत असताना दारु तस्कर पिंटू यांच्या काही साथीदाराला अटक केली होती व या मध्ये दारू तस्कर पिंटू याला फरार दाखविण्यात आले होते. मात्र यानंतर बिंदासपणे दुचाकीवर देशी व विदेशी दारूच्या पेट्या चिल्लर व ठीक विक्रत्यांना पोहोचविण्याचे काम सुरूच आहे. एरवी दारू तस्करावर बाजीराव चालविणारे ठाणेदार पाटील यांचा बाजीराव दारू तस्कर पिंटू वर चालत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे दारू तस्करीतून “रईस” बनलेल्या पिंटू उर्फ अनिल सिंग जुनी याचा पाठीराखा कोण ? हा विषय संशोधनाचा ठरताना दिसत आहे.या दारू तस्करांना वेळीच न आवरल्यास वरोरा सारख्या शांतप्रिय शहराच्या स्थितीला गालगोट लागल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या दारू तस्कर पिंटूच्या मोबाईल चा सीडीआर काढून दारू तस्करीत सामील असणाऱ्या वर कारवाही करण्याची गरज आहे.

Previous articleखळबळजनक :- महाराष्ट्र मेट्रोचे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला, एका आरोपीला अटक तर एक फरार.
Next articleधक्कादायक :- स्वतःच बांधकाम तोडण्याचे आदेश देणाऱ्या सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे स्वतःच्या आदेशाचीच माहिती विसरल्या ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here