Home चंद्रपूर खळबळजनक :- महाराष्ट्र मेट्रोचे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला, एका आरोपीला...

खळबळजनक :- महाराष्ट्र मेट्रोचे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला, एका आरोपीला अटक तर एक फरार.

 

अवैध दारू विक्री करून दादागिरी करणाऱ्या पिंटू व प्रदीप वाढईला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून तडीपार करण्याची मागणी. 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या हप्तेखोरी धोरणामुळे जणू आता सरक्षण मिळायला लागले आहे. अशाच इंदिरा नगर येथील पिंटू व प्रदीप वाढई या अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चक्क तलवारीने महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना काल रात्री ९.०० च्या दरम्यान इंदिरा नगर येथे घडली. या हल्ल्यात रोहित तूराणकर यांच्या आई ला सुद्धा दुखापत झाली असून जर वेळीच त्या ठिकाणी लोक धावून गेले नसते तर आरोपीने जीवच घेतला असता अशी चर्चा आहे. आरोपी हल्ला करुंण पसार झाल्यानंतर काही तासातच एका आरोपीला पकडले तर दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या अवैध दारूचे धंदे करणाऱ्या दोघांना विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी होत आहे,या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हाके यांच्या नेत्रुत्वात सुरू असून दुसऱ्या आरोपीला लवकरच पकडून पी सी आर घेण्यात येईल असे पोलिस सूत्रांकडून कळते …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here