Home चंद्रपूर क्राईम रिपोर्ट :- चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल तीन मर्डरच्या घटनेने जिल्हा हादरला.

क्राईम रिपोर्ट :- चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल तीन मर्डरच्या घटनेने जिल्हा हादरला.

बोर्डा येथील एक तर चंद्रपूर शहरातील रयतवारी येथील दोन मर्डरच्या घटना जिल्ह्यात गुन्हेगारी वाढविणाऱ्या ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसातच तब्बल अर्धा डझन मर्डर च्या घटना झाल्या असून बल्लारपूर माजरी येथील भरदिवसा झालेल्या मर्डर च्या घटनेनंतर काल बोर्डा या गाव शिवारात व शहरातील रयतवारी मधील दोन मर्डर च्या घटना बघून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे दर्शवित आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय व मोठ्या प्रमाणात या अवैध धंद्यात असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे पुन्हा मर्डर च्या घटना वाढू शकते अशीच एकूण परिस्थिती दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार बोर्डा गाव शिवारात राजू येरणे ह्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून करून पळ काढला होता तर चंद्रपूर शहरातील रयतवारी येथे करण केवट या २५ वर्षीय युवकाचा समरूज महमद शेख यांनी धारदार शस्त्राने खून केला तर केवट परिवाराणे खुनाचा बदला म्हणून खून करणाऱ्या समरूज ह्याच्या काकांचा साजिद अली नामक व्यक्तीचा धारदार शस्त्राने केवट समुदायाच्या लोकानी बेदम मारहाण करून खून केला.

Previous articleधक्कादायक :- भीम आर्मीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन.
Next articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 439 बाधिताची नोंद ; सात बाधितांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here