Home भद्रावती धक्कादायक :- भीम आर्मीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन.

धक्कादायक :- भीम आर्मीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन.

 

नऊ दिवसाच्या प्रखर झुंजी नंतर नागपूरच्या  खाजगी रुग्णालयात आज झाले निधन.

भद्रावती प्रतिनिधी :-

दलित चळवळीतील एक अग्रगण्य युवा नेता म्हणून ज्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून राष्ट्रीय स्तरावरच्या भीम आर्मी या सामाजिक संघटनेत चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य सुरू करणारे राजू देवगडे यांचे आज कोरोना संक्रमण झाल्याने नऊ दिवसाच्या झुंजी नंतर नागपूर येथे दुःखद निधन झाले. त्यामुळे दलित संघटनेचा एक प्रखर युवा नेता हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय सहभाग व भद्रावती येथे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथम सदस्य निवडून आलेले राजू देवगडे यांनी भारीप बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष आणि आता भीम आर्मी असा राजकीय सामाजिक प्रवास करून आपली राजकारणात छाप सोडली खरी पण कधीही हार न मानणारे राजू देवगडे यांना मोठ्या प्रमाणात शुगर ची बीमारी होती आणि त्यातच त्यांना कोरोना ची लागण झाल्याने चंद्रपूर च्या डॉ. झाडे यांच्या रुग्णालयात नऊ दिवसापूर्वी भरती करण्यात आले होते पण आज अचानक प्रक्रुती जास्तच बिघडल्याने त्यांना नागपूर येथे आज हलविण्यात आले मात्र आज दुपारी 2.30 वाजता त्यांचे दुःखद निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here