Home गडचिरोली खळबळजनक :- कुरखेडा चे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यावर पुन्हा विभागीय...

खळबळजनक :- कुरखेडा चे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यावर पुन्हा विभागीय चौकशीचा फास ?

 

पण मुख्य वनसंरक्षक प्रवीण प्रत्यक्ष त्यांच्यावर कारवाई का करीत नाही?अनेकांचा सवाल.

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांचेवर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीने पुन्हा एकदा विभागीय चौकशी लागली असली तरी सोनटक्के यांचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर व तपासामध्ये ते निष्पन्न झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर प्रत्यक्ष निलंबनाची कारवाई का होत नाही ? असा सवाल वन विभागात चर्चेचा बनला आहे. एरव्ही एखाद्या वन कर्मचारी यांनी केलेली छोटी मोठी अफरातफर त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नांदी ठरू शकते तर विभागीय चौकशीत सोनटक्के यांच्यावरील आरोप खरे ठरले असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का होत नाही ? हा गंभीर प्रश्न वन विभागात कळीचा मुद्दा बनला आहे.

कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक किर्तिमान सध्या चौकशीच्या घेऱ्यात आहे, त्यातच आता भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमीच्या अनुषंगाने पुन्हा विभागीय चौकशी लागली खरी पण मुख्य वन संरक्षक प्रवीण हे चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कारवाई करण्याची शिफारस मंत्रालय स्तरांवर का करीत नाही याबद्दल तर्कवितर्क लावल्या जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मी सगळ्या अधिकाऱ्यांना सेट केले माझे कुणी काही बिघडवु शकत नाही असे म्हणणारे सुनील सोनटक्के हे संपादक यांना सुद्धा सेट केल्याची भाषा बोलत असल्याने ह्या थोतांड अधिकाऱ्यांवर त्वरित कोरोना संक्रमण काळातील पहीली कारवाई व्हावी अशी वन कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Previous articleखळबळजनक :- गडचांदूर पोलीस स्टेशन समोरच विकल्या जाते देशी विदेशी ब्रांडची दारू, ठाणेदार भारतीची परवानगी ?
Next articleउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तहसीलदार सचिन गोसावी यांचा काँग्रेस कामगार संघटनेतर्फे सत्कार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here