Home कोरपणा खळबळजनक :- गडचांदूर पोलीस स्टेशन समोरच विकल्या जाते देशी विदेशी ब्रांडची दारू,...

खळबळजनक :- गडचांदूर पोलीस स्टेशन समोरच विकल्या जाते देशी विदेशी ब्रांडची दारू, ठाणेदार भारतीची परवानगी ?

 

हॉटेलच्या नावावर विविध विदेशी ब्रांडची सुदर्शन दासरी करतोय खुलेआम विक्री, रवी केवट, मंगेश व रवी शेळके यांचीही दारू विक्री जोमात?

पोलीस पंचनामा भाग – २

गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांच्या भ्रष्ट लीला वाचल्या तर स्वत नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे थक्क होतील एवढा भ्रष्ट मायाजाळ ठाणेदार भारती यांनी तयार केला आहे. जिथे पोलिसांना घाबरून अवैध धंदेवाईक पळून जातात तिथे चक्क गडचांदूर पोलीस स्टेशन समोरच सुदर्शन दासरी यांनी हॉटेल च्या नावावर वेगवेगळ्या विदेशी ब्रांड ची दारू व चिल्ड बीअर ची खुलेआम विक्री चालवली आहे. एवढेच नव्हे तर माणिकगड सिमेंट कंपनी गेट व पोलीस स्टेशन च्या जवळ रवी केवट, मंगेश व अरुण शेळके हे सुद्धा अवैध दारू विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहे, मात्र ठाणेदार गोपाल भारती यांचे या अवैध दारू विक्री करणाऱ्या सोबत हप्ताखोरी चे सबंध असल्याने त्यांची पोलीस स्टेशन समोर दारू विक्री करण्याची हिंमत होत आहे, जे पोलिसांच्या कर्तव्याला न शोभणारे असे विदारक चित्र दिसत आहे.

ठाणेदार गोपाल भारती यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनची गरीमा धोक्यात आणून “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीद संदेशाची राखरांगोळी केली आहे, त्यातच इथे फक्त चोर शिपायाचा पोरखेळ खेळल्या जात असून सर्वसामान्यांना उद्धट वागणूक तर दोन नंबरी व अवैध व्यावसायिकांना मान सन्मान मिळतो, म्हणजे ठाणेदार गोपाल भारती फक्त आणि फक्त पैसे कुठून मिळतात याच्याच शोधात असतात, खरं तर त्यांना आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत क्षेत्रात सामाजिक आरोग्य बिघडले काय किंव्हा एखाद्या वर अन्याय झाला काय ? याची बिलकुल तमा नाही, असेच एकूण चित्र दिसत आहे. ज्या पोलीस स्टेशन समोरच आणि जवळील परिसरात अवैध दारू विक्री होत असताना त्या रस्त्यातून मार्गक्रमन करणाऱ्या युवती व महिला यांना त्रास होत असेल तर ह्या पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून मुली, युवती व महिलांचे रक्षण होणार कसे? हा मोठा गंभीर प्रश्न असून आता ठाणेदार यांच्या भ्रष्ट कारवायांची विभागीय चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी करावी अशी मागणी गडचांदूर शहरातील नागरिकांकडून होत आहे.

पुढे वाचा ठाणेदार भारतीचे त्या दारू तस्करांसोबतचे सबंध.

Previous articleधक्कादायक :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे चक्क महापौर कंचर्लावार यांनीच केले उल्लंघन,
Next articleखळबळजनक :- कुरखेडा चे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यावर पुन्हा विभागीय चौकशीचा फास ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here