Home वरोरा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तहसीलदार सचिन गोसावी यांचा काँग्रेस कामगार संघटनेतर्फे सत्कार.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तहसीलदार सचिन गोसावी यांचा काँग्रेस कामगार संघटनेतर्फे सत्कार.

 

तहसीलदार गोसावी यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकारणी, लोकप्रतिनिधी यांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेछा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्याचे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्यातील जनतेची केलेली सेवा व अनेक विपत्तित जनतेला शासनाकडून मिळवून दिलेला मोबदला व नुकसान भरपाई यामुळे सर्वाना आपलेसे वाटणारे तहसीलदार सचिन गोसावी यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल त्यांचा काँग्रेस कामगार संघटनेतर्फे तहसील कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम सभापती यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विशाल पारखी. काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्ष मोसिम पठाण, निखिल ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सचिन गोसावी हे मागील ३ वर्षापासून वरोरा तहसील कार्यालयात कार्यरत असताना त्यांचे काम ग्रामीण जनतेचे समाधान करणारे व त्यांच्या समस्या काळजी पूर्वक हाताळणी करणारे होते, त्यांनी ३ वर्षात या परिसरातील शेतकरी गोरगरीब निराधार व सामान्य नागरिकांच्या विविध समस्या सोडवून त्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून दिला, त्यामुळे सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते, लोकप्रतिनिधीसोबत त्यांचे आपुलकीचे सबंध होते, एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी तीन वर्ष या ठिकाणी राहून सर्व सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे काम केले आहे व कोरोना महामारीत त्यांनी लोकांना त्यांनी एक चांगली सेवा देऊन गोरगरिबांना मोफत अन्नधान्य मिळण्याकरिता व इतर मदत मिळण्याकरिता सहकार्य केले.आता त्यांची बदली गोंदिया जिल्ह्यात झाली असून त्यांनी जनतेचे आतापर्यंत केलेले काम व सहकार्य बद्दल त्यांचे आभार व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेछा काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आल्या.

Previous articleखळबळजनक :- कुरखेडा चे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यावर पुन्हा विभागीय चौकशीचा फास ?
Next articleचिंताजनक :- गेल्या 24 तासात सात कोरोना बाधितांचा मृत्यू, 92 नव्या बाधितांची नोंद;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here