Home चंद्रपूर चंद्रपूर शहरात झालेल्या विशाल मोर्च्यात ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून वेधले...

चंद्रपूर शहरात झालेल्या विशाल मोर्च्यात ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून वेधले सरकारचे लक्ष,

 

ओबीसी जनगणना करा व संख्येने ५२ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ओबीसीना न्याय द्या अशी केली सभेतुन मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून या मोर्चाला ऐतिहासिक बनबिल्याचे चित्र निघालेल्या भव्य मोर्च्या दरम्यान बघावयास मिळाले, अतिशय शिस्तीत निघालेल्या या मोर्च्यात गावखेड्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव आले होते, महत्वाची बाब म्हणजे या मोर्च्यात सर्व राजकीय पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते,
भारतात सगळीकडे ५२ टक्के पेक्षा जास्त लोकसंख्येत असलेल्या ओबीसी समाज आज मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू नसल्याने व मंडल आयोगामधे ठरलेले २७ टक्के आरक्षण सुद्धा मिळत नसल्याने शैक्षणिक व प्रशासकीय संधीपासून दूर गेला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर सुद्धा ओबीसी प्रवर्गातील जातीनिहाय जनगणना झाली नाही, एकीकडे सरकार पशुपक्षी व त्रुतीय पंथीयांची सुद्धा जनगणना करते पण लोकसंख्येत ५२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येने असलेल्या समाजाची जनगणना होत नाही त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर पडला असून जेवढी ज्यांची संख्या तेवढी त्यांची भागीदारी असा निकष ज्याअर्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता आहे तर मग ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण का मिळत नाही? हा गंभीर सवाल ओबीसी समाज या सरकारला विशाल मोर्च्याच्या माध्यमातून विचारत आहे असा सूर मोर्च्या दरम्यान घेतलेल्या सभेतून उमटत होता.

दरम्यान सेल्फ रिस्पेक्ट चे संयोजक परशुराम धोटे यांनी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवले नसल्याचे व्यक्तव्य करून मंचावर असलेल्या खासदार व इतर लोकप्रतिनिधींना एक प्रकारे टोमणा मारला तर काही वक्त्यानी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी समाजाला केवळ ११ टक्के आरक्षण आहे तर गडचिरोली जिल्ह्यात फक्त ६ टक्के आरक्षण आहे त्यामुळे ओबीसी समाजासोबत सरकार अन्याय करीत आहे त्यामुळे ओबीसी समाजाने आता जागरूक व सरकारला संघटित होऊन जॉब विचारला पाहिजेतरच ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण होऊ शकते असे सुद्धा उपस्थित वक्त्यानी मते व्यक्त केली.

Previous articleमनसेचा वीज दरवाढी विरोधात आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा.
Next articleमनसेच्या वीज दरवाढ विरोधातील मोर्चाला मिळाला मोठा प्रतिसाद,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here