Home चंद्रपूर मनसेचा वीज दरवाढी विरोधात आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा.

मनसेचा वीज दरवाढी विरोधात आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी मोर्चात सामील होण्याचे मनसेचे आव्हान !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राज्यात एकीकडे कोरोना संकट काळात अनेक ऊद्दोग व्यापार व छोटे धंदे बंद झाल्याने सर्वसामान्य जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे तर दुसरीकडे राज्यातील वीज ग्राहकांना महाविकास आघाडी सरकारने वीज बीलात मोठी वाढ करून एक प्रकारचा विजेचा शॉक दिला आहे, खरं तर सरकार तर्फे वीज बिलात मोठी सूट मिळेल अशी अपेक्षा असताना त्यातच संबंधित ऊर्जा मंत्र्यांनी तसे संकेत दिले असताना सरकार आपल्या भुमीकेशी यू टर्न मारून वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याची सक्ती करीत असल्याने जिथे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्थाच नाही तिथे वीज बिल भरायचे कसे? हा यक्ष प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी या संदर्भात राज्यपाल यांची भेट घेवून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याची विनंती केली होती मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारने वीज ग्राहकांना कुठलीही सूट न देता सक्तीची वीज बिल वसुली व वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचे आदेश दिल्याने वीज ग्राहकांवर एक प्रकारचा अन्याय हे सरकार करीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यव्यापी महामोर्च्याचे आयोजन केले आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दिनांक २६ नोव्हेंबर ला दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, सचिन भोयर, शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेत्रुत्वात हा मोर्चा संजय गांधी मार्केट चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार असून या मोर्चात हजारोंच्या संख्येने मनसे व पक्षाच्या विविध अंगीक्रुत संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी सामील व्हावे असे आव्हान मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवर यांनी केले आहे.

Previous articleमनसेचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन,
Next articleचंद्रपूर शहरात झालेल्या विशाल मोर्च्यात ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून वेधले सरकारचे लक्ष,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here