Home वरोरा मनसेचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन,

मनसेचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन,

 

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर पिकांच्या बोगस बियाणे, खते व कीटकनाशक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

शेतकऱ्यांना विविध कंपन्या कडून निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते व किटकनाशके कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देवून शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे, काही शेतकऱ्यांचे सोयाबीन झाडाला शेंगांच लागल्या नसल्याने त्या सोयाबीन पिकावर नागर चालविण्याची पाळी शेतकऱयांवर आली आहे, अशातच कपाशी वर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे पीक सुद्धा संकटात आले असल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आता मरणाच्या दारावर उभा असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, तालुका अध्यक्ष वैभव डहाणे व शेतकरी सेनेचे जगदीश लांडगे यांच्या नेत्रुत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या व बोगस बियाणे कीटकनाशके आणि खते विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी करण्यात आली.
एकीकडे देशात कोरोना सकट असतांना व त्यामुळे काम धंदे बंद पडल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाला समोर जावे लागत असतांना जगाचा पोशिंदा शेतकरी सुध्दा मोठया आर्थिक संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्यांना सोयाबिन, कपाशी, धान बियाणे, किटकनाशके व खते हे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने व कपाशी वर ऐनवेळी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, असे असतांना शासनाकडून कुठलीही मदत झाली नाही, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनेक वेळा कृषी अधिकारी, कृषी मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदने देवून शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले होते, मात्र संबंधित बियाणे, किटकनाशके व खत कंपन्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुध्दा दिली गेली नाही, त्यामुळे संबंधित कंपन्या कृषी केंद्र संचालक व कृषी अधिकारी यांच्या अर्थचक्राच्या षडयंत्रात शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन केलेले आहे. या आंदोलनाची दखल घेवून जर शासनाने शेतक-यांना प्रति हेक्टरी ३० हजार रूपये नुकसानभरपाई देवून न्याय दिला नाही तर मनसे खळखट्टयाळ आंदोलन करेल, या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास स्वतः आपण जबाबदार असेल असा इशारा कृषी प्रशासनाला देण्यात आला या प्रसंगी मनसेचे शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद,महिला शहर अध्यक्षा वैशाली वानखेडे, शंकर क्षीरसागर, राजू नवघरे. व असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here