Home भद्रावती खळबळजनक :- तथाकथित पत्रकार अतुल कोल्हे कडून अन्न व औषध प्रशासन विभागाने...

खळबळजनक :- तथाकथित पत्रकार अतुल कोल्हे कडून अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला सुगंधीत तंबाखु व खर्रा.

 

पत्रकारितेच्या नावाखाली अवैध सुगंधीत तंबाखू व खर्रा विक्री,

भद्रावती दि,22 (तालुका प्रतिनिधी)

पत्रकार असल्याच्या सबबीखाली पोलिसांना गुंगारा देवून अवैध सुगंधीत तंबाखू खर्रा विक्री करणाऱ्या अतुल कोल्हे यांच्या भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या चेक पोस्ट समोरील दुकानातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून अवैध सुगंधीत तंबाखू व खर्रा जप्त केल्याची खळबळजनक घटना दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी टाकलेल्या धाडित उघडकीस आली, यावेळी सुगंधित तंबाखु व खर्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्या.

भद्रावती शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखु व खर्र्याची विक्री होत असल्याची बातमी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर काही दिवसापूर्वी प्रकाशित करण्यात आली होती व शहरातील रंगारी व पटेल हे दोन अवैध तंबाखू तस्कर यांचा मोठा व्यवसाय असून शहरातील इतर भागात सुद्धा हा व्यवसाय फोफावला असल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली होती शिवाय भद्रावती शहरातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन यांना तक्रारी दिल्या होत्या, त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाने भद्रावती येथील तथाकथित पत्रकार अतुल कोल्हे यांच्या दुकानावर धाड टाकली व त्यांच्या दुकानातून सुगंधीत तंबाखू व खर्रा पुड्या जप्त करण्यात आल्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here