अष्टपैलू व्यक्तित्व आणि वैद्यकीय क्षेत्रात असून सुद्धा कला क्षेत्राची जाण असणाऱ्या डॉ. शीतलच्या आयुष्यात वादळ का ?
लक्षवेधी :-
आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या आणि त्यांच्या आत्महत्येच्या मागील गुपीतांची चर्चा केवळ वरोरा शहरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे, अतिशय कर्तबगार आणि आपल्या धेयाप्रती तटस्थ व महत्वाकांक्षी असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी अचानक आत्महत्येचा निर्णय घ्यावा म्हणजे त्यांच्या धेयप्राप्तीमधे मोठा अडसर निर्माण झाला, जो त्यांच्या मृतूचे कारण ठरला असेच म्हणावे लागेल. डॉ. शीतल यांनी मृतूच्या आठ तासांपूर्वी एक कॅनव्हास पेंटिग ट्विट केलं होतं. युद्ध आणि शांतता असं सूचक कॅप्शन त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे हे पेंटिग त्यांनी स्वतः रेखाटलं असून त्यावर त्यांचं नाव आणि तारिखही लिहली आहे. या पेंटिंग वरून त्यांच्या युध्द आणि शांतता या शब्दांचा अर्थ विविध आर्टिस्ट वेगवेगळा काढेल पण त्यांनी जीवनात जे ध्येय बाळगले होते ते त्या पूर्ण करू शकल्या नाही, त्याचं शल्य त्यांना नेहमीच बोचत होतं कारण त्यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की मृतूशय्येवर कुणी असताना मला माझ्या जीवनाच्या मागे वळून बघताना मी नेमकं काय केलं ? हे जर बघितलं तर तिने तिचे एखादे ध्येय पूर्ण केले का एक मिलियन झाडे लावली का ? दिव्यांगाची सेवा केली का ? हे प्रश्न महत्वाचे असतात कारण आपल्या जीवनात जे ध्येय असते ते पूर्ण झाल्याचे समाधान मृतूशय्येवर असताना असायला हवे नाहीतर मग उरते ते काय ? मग जगून फायदा तो काय ? सगळे ऐश आराम आहे. सगळ्या गोष्टी सहज मिळतात पण शेवटी जगायचं कशासाठी? कुणासाठी ? असे प्रश्न पडतात आणि मग यावर आपण खरे उतरलो नाही तर मग आत्महत्येचा विचार मनात येतो असे त्यांचे मुलाखतीत सूचक विचार आहे.
डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजकी एक व्यवसायिक आहे, श्रीलंकेत त्यांचा मोठा व्यवसाय आहे पण जेव्हा त्या श्रीलंकेत गेल्या तेंव्हा त्यांना सगळं काही सुख आणि ऐश्वर्य मिळत असताना देखील त्यांना आत्महत्येचा विचार आला, कारण आपण हे जे जगतोय यामागे काय आहे ? का हाच आपला उद्देश आहे ? ह्या प्रश्नांची कोलाहल त्यांच्या आत्महत्येच्या विचाराकडे घेवून गेली. डॉ शीतल आमटे यांना कला क्षेत्रात आवड होती पण त्यांचे वडील विकास आमटे यांना तिने डॉक्टर व्हावं असं वाटत होतं, म्हणून त्या वैद्यकीय क्षेत्रात गेल्या पण मेडिकल मधे तुम्ही एका व्यक्तीकडे केवळ ओबजेक्टिव म्हणून बघू शकता तुम्ही त्याच्याकडे सबजेक्टिव म्हणून समोरच्याला इमोशनल करू शकत नाही अशाही त्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, त्यामुळे त्यांना कला क्षेत्रात मोठी आवड होती हे शीद्ध होते.
कला क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती ह्या भावनाशिल व हळव्या आसतात, तशा डॉ. शीतल पण हळव्या व भावनाशिल होत्या त्यांच्या मनात एक ध्येय होतं ज्यांच त्यांनी कदचित स्वप्न रंगवलेल होतं पण वेळीच त्यांच स्वप्न भंगल आणि त्यांच्या मनात नैराश्य आलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्येच पाऊल उचलल असाव असं अनेकांना वाटतंय.अर्थात मागील डिसेंबर २०१९ पासून त्यांच्या जीवनात असं काय झालं होत की त्यांना आपल्या परिवाराचा रोष ओढून घ्यावा लागला होता? याचा शोध पोलीस तपासात लागेलही पण विविध कलेसोबतच अष्टपैलू व्यक्तित्व असलेल्या डॉ. शीतल आमटे ज्या स्वतः डिप्रेशन मधे असणाऱ्यांना त्यातून बाहेर काढण्याच्या कलेत पारंगत होत्या आणि त्या विषयावर त्यांनी टीवी चैनेल मधे मुलाखतीत डिप्रेशन मधून बाहेर कसे पडायचे? हे सांगितले, त्याच मार्गदर्शकांनी स्वतः डिप्रेशन मधे आत्महत्या करावी म्हणजे त्यांना अगदी टोकाची भूमिका घ्यायला कुणीतरी भाग पाडले किंव्हा त्यांना दिलेला शब्द कुणी पाळला नाही म्हणून वैफल्यग्रस्त मानसिकतेत त्यांनी स्वतःला संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा हेच स्पष्ट होत आहे.