Home वरोरा डॉ.शीतल आमटे यांच्यावर आनंदवनात रात्रीच झाला अंत्यसंस्कार.

डॉ.शीतल आमटे यांच्यावर आनंदवनात रात्रीच झाला अंत्यसंस्कार.

मृत्यूपूर्वी सुसाईड नोट सापडल्याची चर्चा, पोलीस तपासात आत्महत्येचे रहस्य उलगडणार ?

वरोरा प्रतिनिधी :-

आनंदवनात आमटे कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. येथेच डॉ. शीतल आमटे-करजगी राहत होत्या, त्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघत होत्या. काल नेहमीप्रमाणे डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी दुपारी ११.३० वाजताच्या सुमाराला आपल्या कार्यालयातून परत आले. तेव्हा डॉ. शीतलच्या खोलीचे दार बंद असल्याचे लक्षात आले. बराच आवाज देऊनही ते उघडले नाही. शेवटी आनंदवनातील कर्मचाऱ्यांनी द्वार तोडले असता डॉ. शीतल अत्यव्यस्त अवस्थेत खाटेवर पडलेल्या दिसल्या. त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आपल्या निवासस्थानी हाताला विषारी इंजेक्‍शन टोचल्याची चर्चा होती.
दरम्यान डॉ. शीतल यांचे वडील डॉ. विकास आमटे आणि आई डॉ. भारती आमटे हे घटनेच्या वेळी आनंदवनात नव्हते. ते काही कार्यक्रमानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीतच डॉ. शीतल यांनी मृत्यूला कवटाळले.

 आत्महत्येच्या प्रकरणाला विविध वादाची किनार ?

काही दिवसांपूर्वीच शीतल आमटे- करजगी यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. मात्र, काही तासांतच ही चित्रफीत माध्यमातून हटवण्यात आली होती. दरम्यान, डॉ. शीतल यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले होते व या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. डॉ. शीतल यांनीही समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीत सुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. सोबतच काही महिन्यापूर्वी प्रसारमाध्यमांमधे एका राजकीय नेत्यांच्या वादात त्यांचे नाव जोडल्या गेल्याची चर्चा होती व सामाजिक माध्यमात त्याची बरीच चर्चा रंगली होती त्यामुळे त्या खूप अस्वस्थ होत्या का ? त्या संदर्भातच त्यांच्यावर त्यांचे कुटुंबीय नाराज होते का ? हा मुद्दा सुद्धा पोलीस तपासाचा असू शकतो, जर हा विषय असेल तर डॉ.शीतल आमटे यांना ज्यांच्याकडून मानसिक त्रास झाला होता ती गोष्ट त्यांनी आपल्या सुसाईड नोट मधे नक्कीच नमूद केली असेल त्यामुळे सुसाईड नोट ही अनेकांच्या जीवन मरणाची जंत्री शीद्ध होऊ शकते.

पोलिसांकडून मोबाईल लैपटॉप व इतर साहित्य जप्त.

डॉ. शीतल आमटे ह्या अतिशय सवेंदनशील होत्या त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट खटकली तर त्या गंभीर व्ह्ययच्या अशातच त्या आपल्या जवळच्या काही लोकांसोबत मोबाईल आणि लैपटॉपवरून विविध माध्यमातून चर्चा करायच्या त्यामुळे मोबाईल आणि लैपटॉपमधे त्यांच्या आत्महत्येचे गुपित नक्कीच दर्ज असेल अर्थात ते साहित्य अनेकांना चौकशी दरम्यान शिक्षा देण्यास समर्थ ठरू शकते.

रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य?

एकीकडे कोरोनाची स्थिती आणि अंत्यसंस्कारासाठी होणारी मोठी भीड टाळण्यासाठी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे बोलल्या जात असले तरी त्यांचा फार मोठा मित्र परिवार आणि संपूर्ण राज्यात पसरलेली शोककळा यामुळे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आज अलोट गर्दी उसळनार ही शक्यता लक्षात घेता त्यांचा अंत्यसंस्कार रात्रीच आटोपला खरा पण याबद्दल तर्कवितर्कलावले जात आहे विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदन न करता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नागपूर च्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्याने हे हायप्रोफाइल प्रकरणाची चर्चा जनतेत चांगलीच रंगत आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येमागचे रहस्य सीबीआय चौकशीतून होणार उघड?
Next articleचिंतनीय:- डॉ.शीतल आमटे यांना कधी आले होते आत्महत्येचे विचार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here