Home वरोरा ब्रेकिंग न्यूज :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येमागचे रहस्य सीबीआय चौकशीतून...

ब्रेकिंग न्यूज :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येमागचे रहस्य सीबीआय चौकशीतून होणार उघड?

 

पारिवारिक मतभेद निर्माण होण्यास कोण जबाबदार ? यांवर गंभीर चिंतन होणे गरजेचे.

वरोरा प्रतिनिधी :-

आपल्या कुष्ठरोगी सेवा समितीच्या माध्यमातून अवघ्या जगात आनंदवन या संस्थेला आपल्या उत्तुंग कार्यातुन जागतिक मान्यता मिळविणारे स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कार्याची दखल जगातील सर्वच सेवाभावी संस्थेने ऊद्दोगपती आणि कलाकार, साहित्यिक इत्यादींनी घेतली, नव्हे जागतिक स्थरावर आनंदवन हे कुष्ठरोग्याच एक प्रकारे नंदनवनच ठरलं. तर अंध अपंग मूक बधीर इत्यादीना आश्रयस्थळ ठरलं. त्या जागतिक स्थरावरच्या आनंदवनात संस्थापक बाबा आमटे यांच्या नात असलेल्या डॉ, शीतल आमटे यांनी आत्महत्या करावी म्हणजे ही  धक्कादायक बाब तर आहेच पण तितकीच क्लेषदायक बाब आहे.

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या करावी एवढ्या त्या कमजोर मनाच्या नक्कीच नव्हत्या, कारण सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात त्यांचे असंख्य मान्यवरांसोबत अगदी मैत्रीपूर्ण सबंध होते, त्या आपल्या व्यथा मैक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी शेअर करायच्या अर्थात त्या अनेकांशी शेअर करायच्या पण तरीही आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेण्याइतपत त्या अस्वस्थ का झाल्या ? त्यांच्या व्यक्तिगत जीवनात कुठले तुफान आले होते ? की अख्खा त्यांचा परिवारच त्यांच्या विरोधात गेला, अगदी त्यांची आई पण त्यांना समजून घेत नव्हती आणि भाऊ कौस्तुभ आणि अनिकेत हे त्यांच्यावर आरोप लावायचे त्यामुळे असं काहीसं मोठं अंतर्गत वादळ त्यांच्या घरी घोंगावत होतं, ज्या वादळात त्यांच अस्तीव डामाडोल व्हायला लागलं आणि म्हणूनच यांना स्वतःला संपविण्याचा निर्णय घ्यावा लागला या वस्तुस्थितीला शोधणं खूप गरजेच आहे, विशेष म्हणजे मध्यंतरी त्यांची सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांतून अप्रत्यक्षपणे झालेली बदनामी त्या सहन करू शकल्या नाही का ? या प्रश्नासह विविध बाबीचा सीबीआय चौकशी लागली तर खरा शोध लागू शकतो, खरं तर डॉ शीतल आमटे यांनी अखेरचा निर्णय घेण्याअगोदर मैक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी व्हाट्सअप वर झालेले सकाळी १० वाजून ४२ मिनिटाचे संभाषण हे अखेरचे ठरले पण जर आंबेकर यांनी प्रत्यक्ष फोन करून जर डॉ.शीतल आमटे यांच्याशी सरळ फोनवर चर्चा केली असती तर कदाचित डॉ, शीतल आमटे यांचा जीव वाचला असता पण दुर्दैव हे की त्यांनी अखेरचा मेसेज पाठवून आपली जीवनयात्रा संपवली, असं म्हटलंय जातं की मनातील विचारांच वादळ, भावनांचा गुंता ज्याचा त्यालाच माहीत असतो.पण डॉ शीतल आमटे यांच्या  अचानक अशा निर्णयाने अवघे राज्य शोक सागरात बुडाले, कारण महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान म्हणून मिळवून देणारे पद्मश्री श्रध्देय बाबा आमटे यांच्या श्रमाने आनंदवन उभे राहिले आणि त्यांच्याच वारसाकडून जर आत्महत्या होत असेल तर यामागची रहस्ये शोधणे आणि यात सामील असलेल्यांना मोठी सजा देणे हे तेवढेच महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here