Home वरोरा धक्कादायक :- पाटबंधारे विभागाला पडला कालव्याच्या देखभालीचा विसर?

धक्कादायक :- पाटबंधारे विभागाला पडला कालव्याच्या देखभालीचा विसर?

 

पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचा खिशाला लागली काञी, पिके पाण्याअभावी करपणार?

खांबाडा प्रतिनिधी(मनोहर खिरटकर)

दरवर्षीप्रमाणे गहु,चना,करडई ,ज्वारी यासारख्या रब्बी पिकाकरीता कँनलचे पाणी मुबलक मिळेल या आशेवर असणाऱ्या खांबाडा परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरण्या केल्या पण पाटबंधारे विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचीत रहावे लागत आहे.
खांबांडा परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दरवर्षी लालनाला, पोथरा धरण, लभानसराड या कालव्यांचे मुबलक पाणी मिळत असल्याने संबंधीत शेतकरी गहु, चना ,करडई, ज्वारी यांसारखी अनेक पिक घेत असतात, त्यासाठी १५ आँक्टोबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत या पिकाची पेरणी शेतकऱ्यांना करावी लागते. पंरतु त्यापुर्वी कालव्याचे पाणी मिळणे आवश्यक असते, यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना संपला तरी काही शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळालेच नाही. पाटबंधारे विभागाने पाणी सोडले परंतु कँनलची देखभाल न केल्याने अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळालेच नाही नव्हे ते पाणी वाया गेले, असाच काहिसा प्रकार खांबांडा शिवारातील वाठोडा शिवारात येणार्या लभानसराड कालव्याचा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार
केशवराव धाबेकर यांच्या शेताजवळील गेटनंबर चार पुर्णपणे खचल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणारे पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला काञी लावुन डिझेल इंजिन च्या साहाय्याने ओलित करण्यासाठी भाग पडावे लागत आहे. याविषयी संबंधीत अधिकारी यांना फोन वर माहिती देण्यात आली परंतु याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आगाऊ चा खर्च सहन करावा लागत आहे.
कँनलला पाणी सोडण्याअगोदर त्याची देखभाल करणे अनिवार्य असताना देखभाल का करण्यात आली नाही ? काय यामधे भ्रष्टाचार झाला ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या देखभालीचा कदाचीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला नसेल तर मग शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित का करण्यात आले? याविषयी परिसरातील शेतकरी वर्गातून चर्चा होताना दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here