एका महिलेच्या ऑडियो क्लिप ने ठाणेदाराचे पितळ उघड ? चौकशीची मागणी.
पोलीस पंचनामा भाग – १२
गडचांदूर ठाणेदार गोपाल भारती यांची अवैध धंदेवाईक यांच्यासोबत असलेली साठगांठ व त्यापासून अवैध धंदेवाईक यांना चढलेला माज यामुळे गडचांदूर परिसरात आता महिलांवर अत्याचार व्हायला लागले असल्याची तक्रार चक्क एका महिलेने संपादक राजू कुकडे यांना भ्रमणध्वनी वरून दिल्याने गडचांदूर पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात असंतोष निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.या अगोदर ठाणेदार गोपाल भारती यांनी कसा पोलीस प्रशासनाच्या “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या ब्रीद वाक्याला हड़ताळ फासला याबद्दल जवळपास १० व्रुत्तमालिका प्रकाशित झाल्या, मात्र त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांची मूक संमती असल्याची चर्चा असून गडचांदूर परिसरात अवैध दारू विक्री, सट्टापट्टी, कोंबड बाजार आणि सुगंधीत तंबाखू विक्री यापासून ठाणेदार गोपाल भारती हे लाखोंची हप्ता वसुली करीत असल्याने व त्यातील काही हिस्सा हा वरिष्ठांना जात असल्याने अवैध धंदेवाईक यांच्यावर पोलिसांचा वचक राहिलेला नाही असे चित्र दिसत आहे.
महिलांची छेड काढली असल्याची तक्रार?
गडचांदूर परिसरातील माणिकगड सिमेंट कंपनी समोर अरुण शेळके हा मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची सर्हास विक्री करीत असून तिथे दारू पिणाऱ्यांची मोठी गर्दी होते व दारूडे हे त्या मार्गाने येणाऱ्या मुली व महिलांची छेड काढतात अशी माहिती असून एका दारुड्यांनी एका महिलेचा हात पकडला असे महिला फोन करून सांगते पण ठाणेदार गोपाल भारती यांच्या आशीर्वादाने अरुण शेळके अवैध दारू विक्री करीत असल्याने पोलीस स्टेशन मधे कुणी महिला तक्रार करण्यास गेली तरी तिला न्याय मिळेल का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,
ठाणेदार गोपाल भारती यांनी पकडलेला 25 ते 35 टक्के दारू साठा विकला?
गडचांदुर ठाणेदार भारती यांचे अवैध दारू तस्करांसोबत असलेले अर्थपूर्ण सबंध हे जगजाहीर असताना जीवती तालुक्यात नवे अवैध दारू व्यवसायी ज्यांच्यावर ठाणेदार भारती यांचा आशीर्वाद नाही त्यामुळे त्यांची दारू पकडणे आवश्यकच होते त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेत्रुत्वात उपपोलिस निरीक्षक युवराज पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी ट्रक वाहन क्र एम एच ४0, B G 6947 या वाहनातून 257 पेटी देशी दारू ने भरलेल्या सुपर सानिक राकेट संत्रा कंपनी सिलबंद निपा रु. 2570000, किमतीची दारू ट्रकवाहनासह पकडण्यात आली असल्याची माहिती आहे तर यामधे वाहन चालक राहुल अंबादास पहूनकर याला रंगेहाथ पकडले तर दोन आरोपी फरार झाले. या सर्वावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा ,सहकलम १८८,65(A) ६५(E)अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पण जाहीर आहे. पण या ट्रक मधे जवळपास ५०० दारू पेट्या असल्याची माहिती होती पण प्रत्यक्षात त्या २५७ पेट्या रेकार्ड वर असल्यामुळे ठाणेदार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते आता त्या गोष्टीचा खुलासा चक्क एका महिलेने केल्याने ठाणेदार गोपाल भारती किती भ्रष्टाचारी आहे हे आता शीद्ध व्हायला लागले आहे, या प्रकरणासोबतच अनेकांनी भुमीपुत्राची हाक च्या संपादकाना तक्रारी दिल्या असून त्याची ऑडियो सुद्धा बनली असल्याने ठाणेदार गोपाल भारती यांची तक्रार पोलीस महानिरीक्षक यांच्यापर्यंत पोहचणार एवढे मात्र नक्की.