रेती डेपो च्या नावावर बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करणाऱ्या त्या रेती डेपो धाराकांना पण ताब्यात घ्या, जनतेची मागणी.
कोरपणा प्रतिनिधी :-
जिल्ह्यात रेती घाट किंव्हा रेती डेपो याचे वाटप झाले नसल्याने रेतीचे भाव गगणाला भिडले आहे, तर ज्यांना घरांचे बांधकाम करायचे आहे त्यांनी चोरट्या मार्गाने रेती विकणाऱ्यांना शोधून रेती चढ्या भावाने रेती विकत घेण्याची सर्कस चालवलेली आहे, मात्र प्रत्येक वेळी चोरट्यांचा डाव साधेलचं असे नाही त्यामुळे काल कोरपणा तालुक्यात चार हायवा रेती ट्रक पोलिसांनी पकडले आणि एकच खळबळ उडाली, कारण ही ट्रक ज्यांची आहे त्या ट्रक मालकावर पण गुन्हे दाखल करून पोलिसांनी रेती माफियांच्या मुसक्या अवळल्या पण महत्वाची बाब म्हणजे ही रेती कुठल्या घाटातून आली आणि ते रेती घाट धारक कोण आहेत याचा पण शोध घेऊन त्या रेती घाट धाराकावर गुन्हे दाखल करायला हवे, कारण यवतमाळ जिल्ह्यात जे रेती घाट व रेती डेपो लिलाव करण्यात आले त्या वणी लगताच्या रेती घाटातूनच रेती उत्खनन व वाहतूक होतं आहे व त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील काही कंत्राटदार रेती डेपो संकलन करण्याच्या कामात भागीदार आहे आणि म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यातील रेती चंद्रपूर जिल्ह्यात येत आहे त्यामुळे ते रेती घाट धारक व भागीदार पोलिसांच्या रडारवर येणार का हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात विकास गायकवाड, नितेश महात्मे, जमीर पठाण, अनुपडांगे, मिलिंद चव्हाण प्रसाद धूळगंडे इत्यादी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नारंडा फाटा बस स्टॅन्ड जवळ सापळा रचून चार हायवा ट्रक पकडले व त्यातील ड्राइवर यांना अटक केली, दरम्यान त्या ट्रक मालकांना पण पोलिसांनी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले व जवळपास 1कोटी 83 लाख 20 हजार रुपताचा माल जप्त केला, या पोलिसांच्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले परंतु ज्या यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट व डेपो ज्यांना मिळाले त्यांच्याचं रेती घाटातून रेती बेकायदेशीरपणे वाहतूक होतं असल्याने त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.