Home चंद्रपूर धक्कादायक :- पडोली पोलीस स्टेशन बनले अवैध वसुलीचा अड्डा, एका महिलेचा विडिओ...

धक्कादायक :- पडोली पोलीस स्टेशन बनले अवैध वसुलीचा अड्डा, एका महिलेचा विडिओ व्हायरल झाल्याने खळबळ,

हप्ता वसुलीतून अवैध धंदेवाईकांना खुली सूट? महिलेची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुगंधीत तंबाखूची विक्री व सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू असून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यापासून लाखो रुपयाची हप्ता वसुली होत असल्याची माहिती आहे.अशातच एका महिलेचा चिल्लर दारू विक्रीचा व्यवसाय होत्या त्या महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा तिला पैशाची मागणी बीट जमादार यांच्यामार्फत झाल्याचा विडिओ व ऑडियो व्हायरल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैध धंद्याना ऊत आला असून ठाणेदार यांच्या आशीर्वादाने मोठे अवैध धंदेवाईक मालामाल होत आहे तर चिल्लर दारू विक्रेत्यांना वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून पैशाची मागणी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका महिलेने याबाबत तीचेवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचतांना प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देत पडोली पोलीस स्टेशन च्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर पैसे मागत असल्याचा आरोप केला आहे एवढेच नव्हे तर त्या महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असल्याची माहिती दिली असल्याने आता ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणें औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleखळबळजनक :- देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करा”
Next articleखळबळजनक :- गडचांदूर नगरपरिषदच्या निष्काळजीपणामुळे डुकराच्या हल्ल्यात एकाचा म्रुत्यु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here