Home भद्रावती धक्कादायक :- कर्नाटका एम्टा कोळसा खाण सुरू होण्याअगोदरच राजकारण ?

धक्कादायक :- कर्नाटका एम्टा कोळसा खाण सुरू होण्याअगोदरच राजकारण ?

 

पाच वर्ष झोपलेले नेते आत्ताच का झाले सक्रिय?

पब्लिक पंचनामा :-

भद्रावती तालुक्यातील केपीसीएल कोल ब्लॉक अर्थात कर्नाटका एम्टा कोळसा खाण कंपनीत प्रकल्पग्रस्त व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करा अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे. त्यात त्यांचे म्हणणे आहे की केपीसीएल (कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमि) च्या माध्यमातून निरंतर स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी व पूर्व कामगारांची पिळवणूक होत असतांना त्यांना यथोचित न्याय मिळणे हा त्यांचा प्राथमिक हक्क असताना त्यांच्या हक्कांना तिलांजली देण्याचे कार्य केपीसील च्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे केपीसील च्या हेकेखोर भूमिकेला आळा घालून प्रकल्पग्रस्त शेतकरी व पूर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याची त्यानी मागणी केली.पण महत्वाची बाब म्हणजे पाच वर्ष ही कोळसा खाण बंद होती तेंव्हा हंसराज अहिर हे केंद्रात मंत्री असताना कोणत्या बिळात लपलेले होते ? जरा याचीही माहीती प्रकल्पग्रस्त आणि त्या कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांना दिली तर कदचित त्यांच्या आत्ताच्या मागणीला काही अर्थ राहील, कारण जेंव्हा केंद्रात भाजप सरकार व  राज्यात सुद्धा भाजप सत्तेत असताना व स्वतः केंद्रात ग्रूह्रराज्य मंत्री हे महत्वाचे पद हंसराज अहिर यांच्याकडे असताना तेंव्हा प्रकल्पग्रस्त आणि तेथील शेतकरी कामगार व कर्मचारी यांची व्यथा यांना समजली नव्हती का ? विशेष म्हणजे ही कोळसा खाण बंद झाली तेंव्हा स्थायी कर्मचारी, कामगारांचे पगार व्हावे म्हणून त्यांनी शासन दरबारी खेटा मारल्या एवढेच नव्हे तर हंसराज अहिर यांच्याकडे सुद्धा त्यांनी साकडे घातले पण त्यांना न्याय मिळाला नाही मग आत्ताच त्यांना प्रकल्पग्रस्त आणि कामगारांचा पुळका का ? ही बाब न समजण्याएवढे कामगार शेतकरी व प्रकल्पग्रस्त दुधखुळे नक्कीच नाही आणि म्हणून जेंव्हा पद होते तेंव्हा हंसराज अहिर काही बोलत नव्हते आणि आता पद गेल्यावर जर त्यांना कंपनी सुरू होण्या अगोदर जर प्रकल्पग्रस्त स्थानिक शेतकरी व कामगार यांचा कळवळा यावा म्हणजे आश्चर्यच आहे.

भद्रावती तालुक्यातील या कोळसा ब्लॉक चे खनन कार्य बंद असतांना या ब्लॉक मधील उपलब्ध कोळसा साठ्यातून (ग्राउंड स्टॉक) लाखो टन कोळशाची चोरी व हेराफेरी झाली असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी पत्राच्या माध्यमातून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई यांना कळविले आहे. याबाबत प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या माध्यमातून हे प्रकरण पुढे आले असून सदर ब्लॉक मध्ये नक्कीच कोळशाची चोरी झाल्याचे यातून निष्पन्न सुद्धा झाले होते. त्यामूळे सरकारच्या या अमूल्य खनिज संपत्तीची झालेल्या चोरीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी हंसराज अहीर यांनी कोळसा मंत्र्यांकडे केली? मग  जेंव्हा हंसराज अहिर स्वतः देशाचे ग्रूहराज्य मंत्री होते, तेंव्हा त्यांच्या हातात सत्ता होती तेंव्हा त्यांनी या कोळसा चोरीची चौकशी का लावली नाही ? हे येथील प्रकल्पग्रस्त स्थानिक शेतकरी व कामगार कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला हवे व किमान ही कोळसा खाण सुरू होऊ द्यायला हवी, कारण ही कंपनी बंद झाल्याने हजारो कामगार कर्मचारी बेरोजगार झाले त्यावर आधारित अनेक कामधंदे बंद झाले अगोदर ते सुरू होऊ द्या आणि तुम्हांला खरोखरंच त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर कायदेशीर मार्गाने तो मिळवून द्या पण हजारो लोकांना रोजगार मिळतोय तो रोजगार तुम्ही स्वतःच्या राजकारणासाठी बंद होऊ देऊ नका एवढीच जनतेच्या वतीने पब्लिक पंचनामा यातून विनंती ….

Previous articleखळबळजनक :- गडचांदूर नगरपरिषदच्या निष्काळजीपणामुळे डुकराच्या हल्ल्यात एकाचा म्रुत्यु.
Next articleखळबळजनक :- पडोली पोलीस स्टेशनचे बीट जमादार तडवेकर यांच्या हप्ता वसुलीची क्लिप व्हायरल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here