Home चंद्रपूर खळबळजनक :- पडोली पोलीस स्टेशनचे बीट जमादार तडवेकर यांच्या हप्ता वसुलीची क्लिप...

खळबळजनक :- पडोली पोलीस स्टेशनचे बीट जमादार तडवेकर यांच्या हप्ता वसुलीची क्लिप व्हायरल.

 

ठाणेदार कसार यांच्या मौन भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

 

जिल्ह्यात दारूबंदी ही सर्वसामान्य माणसाला अभिशाप ठरली असली तरी पोलिसांना मात्र ती एक पर्वणी ठरली आहे, नव्हे त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ती वरदान सुद्धा ठरली आहे. त्यामुळे आपल्या घटनादत्त कर्तव्याला मूठमाती देवून पैशाच्या मोहात त्यांनी अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ता वसुलीची जणू दुकानदारी थाटली की काय ? अशीच विदारक परिस्थिती दिसत आहे.
पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार कसार यांच्या नेत्रुत्वात सद्ध्या अवैध दारू विक्री व अवैध दारू वाहतूक करणाऱ्या काही मोजक्या मंडळीचा व्यवसाय भरभराटीस आला आहे पण जे चिल्लर अवैध दारू विक्रेते आहे त्यांच्यावर केसेस करून आम्ही अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावला असल्याचा आव ठाणेदार यांच्याकडून बघावयास मिळत आहे अशातच पोलिस स्टेशन ची बीट जमादार दादाराव तडवेकर यांनी एका महिलेला दहा हजार रुपयाची मागणी केल्याची ऑडियो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात त्या पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली खरी पण अजूनही त्या बीट जमादार यांच्यावर कारवाई झाली नसल्याची बाब समोर आल्याने ठाणेदार कसार सुद्धा यामधे सामील आहे का ? हा प्रश्न त्या अर्थाने महत्वाचा ठरत आहे. एका महिलेवर अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा तिच्याकडून दहा हजाराची मागणी बीट जमादार करीत असेल तर त्यामधे ठाणेदार कसार नेमके कोणत्या भूमिकेत आहे ? हे समजायला मार्ग नसून ठाणेदार कसार यांच्या सांगण्यावरूनच तडवेकर यांनी त्या महिलेकडुन पैशाची मागणी केली का ? याची वरिष्ठांकडून चौकशी होणे गरजेचे आहे कारण एकीकडे न्यूज पोर्टल च्या प्रतिनिधीची चौकशी करण्याचे सूतोवात त्यांनी केले होते त्यामुळे आता यांच्या या प्रकरणाची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here