Home वरोरा विशेष :- उत्कृष्ट कार्याबद्दल अधीक्षक अभियंता संध्या चिवडे यांचा शाल श्रीफळ देऊन...

विशेष :- उत्कृष्ट कार्याबद्दल अधीक्षक अभियंता संध्या चिवडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार.

 

महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता जिल्ह्याचे प्रमुख झालेल्या संध्या चिवडे यांनी वरोरा शहराची मान उंचावली.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथील मूळ रहिवासी असलेल्या संध्या चिवंडे यांनी आपल्या नौकरी पेशात उत्कृष्ट कार्य करून व परिश्रम घेऊन कनिष्ठ अभियंता पासून ते आज महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अशी मजल मारत जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या प्रमुख पदापर्यंत झेप घेतली त्यामुळे त्यांनी वरोरा शहराचा मान वाढविला असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांचे वडील सुद्धा वरोरा शहरात ज्येष्ठ नागरिक संघ व सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवून अनेकांना मदतीचा हात देत आहे, त्यातच त्यांच्या मुलीने (संध्या चिवडे) वरोरा शहरासाठी एक आदर्श निर्माण केला असल्याने चंद्रपूर येथील त्यांच्या महावितरण कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वरोरा नगरपरिषद चे सार्वजनिक बांधकाम सभापती तथा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार छोटू भाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केला, व पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्या, त्यांचा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा व आपल्या शहराचे जिल्ह्याचे नाव रोशन करावे अशी अपेक्षा याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here