Home चंद्रपूर सनसनिखेज;- डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे सत्य बाहेर येणार की कायमचे रहस्य...

सनसनिखेज;- डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे सत्य बाहेर येणार की कायमचे रहस्य बनून राहणार ?

 

संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजमनाला हादरून सोडणाऱ्या घटनेमागचे नेमके कारण काय?

चंद्रपूर :-

जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शितल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील समाजमन हळहळले होते, पण डॉ.शीतल आमटे यांनी आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय ? आमटे कुटुंबात कोणत्या कारणाने वाद निर्माण झाला ? महाराष्ट्र मैक्सचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी प्रसारमाध्यमांद्वारे सांगितल्या प्रमाणे डॉ शीतल आमटे यांच्यावर अत्याचार झाल्याची बाब उघड होते तर ह्या सर्व गोष्टी पोलीस तपासात उघड कधी होणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे, दरम्यान आत्महत्येच्या १३ दिवसातच डॉ. शीतल आमटे यांच्या पतीने ६ वर्षाचा मुलगा शर्विलसह आनंदवनचा निरोप घेत पुणे गाठले असल्याने आमटे परिवारापासून त्यांना चांगली वागणूक मिळाली नसावी असा अंदाज येत आहे.

खरं तर डॉ. शीतल आमटे ह्या प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या व काहीतरी जगावेगळ करण्यासाठी धडपडणाऱ्या स्वयंसेवी स्वभावाच्या होत्या पण अचानक त्यांच्या जीवनात असं काय घडलं की त्यांच्या कुटुंबात वादळ निर्माण होऊन त्यांना आपलं जीवनच संपविण्याचा विचार आला ? एरव्ही आमटे कुटुंबात कधी वादच होत नव्हता तर कुठल्या कारणावरून डॉ शीतल आमटे ह्या मानसिक तणावात होत्या ? या सगळ्या बाबी पोलीस तपासात बाहेर येईलच पण जी लोकं डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे त्यांना सजा होणे तितकेच महत्वाचे आहे, कारण एका उच्चशिक्षित व्यक्तीने स्वतःला संपविण्याचा विचार करावा ज्या स्वतः मानसिक तनावातुन बाहेर कसे पडावे याचे मार्गदर्शन दुसऱ्यांना करायच्या म्हणजे त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला असेल तो अकल्पीतच आहे, त्यामुळे डॉ शीतल आमटे यांच्या आत्महत्येमागचे कारण समोर येणार की हे प्रकरण कायम रहस्य बनून राहणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here