Home चंद्रपूर चंद्रपूर शहर महानगरपालीका हद्दित का होत आहे रात्रीची संचारबंदी?

चंद्रपूर शहर महानगरपालीका हद्दित का होत आहे रात्रीची संचारबंदी?

आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार होणार  कारवाई.

चंद्रपूर दि. 22 :-

कोरोना संकट अजूनही टळले नसून नव्याने पुन्हा कोरोना संक्रमणाची भीती बघता महाराष्ट्र राज्य शासनाने कठोर पाऊले उचललेले आहेत त्या द्रुष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालीका हद्दीत नागरिकांना रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपावेतो मुक्त संचार करण्यास राज्य शासनाचे निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मनाई आदेश काढला आहे. सदर आदेश दिनांक 22 डिसेंबर 2020 पासून 5 जानेवारी 2021 या कालावधीसाठी लागू राहील.

वैद्यकीय व आपातकालीन सेवोतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here