Home चंद्रपूर खळबळजनक ;- जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला?

खळबळजनक ;- जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला?

 

दारूच्या नशेत असणाऱ्यांना गुंडांचा नेम हुकल्याने पोतनवार बचावले.

चंद्रपूर :

काल शनिवार दिनांक 26 डिसेंबर २०२० रोजी ज्येष्ठ पत्रकार, व समाजवादी पक्षाचे माजी प्रांताधिकारी किशोर पोतनवार (वय 76) यांचेवर दादमहाल वार्ड येथील त्यांच्या राहत्या घरी वार्डातीलचं एका गावगुंडाणे ते स्वत:च्या घरासमोर वृत्तपत्र वाचत असतांना तलवारीने हमला केला. परंतु हातामध्ये काठी असल्यामुळे आणि वार करणारा गुंड हा पिऊन असल्यामुळे त्याचा नेम हुकला व त्यामुळे ते बचावले, यासंदर्भात काल शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात आली, शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. विभागाच्या टीमने आरोपी विलास नागुलवार याला हत्यारासहीत ताब्यात घेतले, आरोपी विलास नागुलवार हा दारूच्या नशेमध्ये होता, त्याच अवस्थेत शस्त्रासह त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात कोणता गुन्हा दाखल केला.महत्वाची बाब म्हणजे एखाद्या ज्येष्ठ पत्रकारावर या पद्धतीचा प्राणघातक हल्ला होत असेल तर ही बाब कायदा व सुव्यवस्थेला हानिकारक आहे.

सविस्तर वृत्त असे की, काल शनिवार दिनांक 25 डिसेंबर रोजी किशोर पोतनवार हे दादमहाल वार्ड येथील आपल्या राहत्या घरासमोर खुर्ची टाकून पेपर वाचत असताना शेजारीच राहणारा विलास नागुलवार हा दारूचे नशेमध्ये तलवार घेऊन फिरत होता. आणि अर्वाच्य शब्दांमध्ये शिवीगाळ करत होता, त्यावेळी बाहेर वृत्तपत्र वाचत बसलेले किशोर पोतनवार यांनी त्याला टोकले असतात तलवार घेऊन तो त्यांच्या अंगावर धावून आला व अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करत त्यांनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला पण किशोर पोतनवार यांच्या हातामध्ये लाठी असल्याने त्यांनी स्वतःचा बचाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here