Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर कारागृहात एका कैद्याची हत्त्या की आत्महत्या ?

धक्कादायक :- चंद्रपूर कारागृहात एका कैद्याची हत्त्या की आत्महत्या ?

 

कारागृह प्रशासनाची उडाली भंबेरी पत्रकारांना माहिती देण्यास विलंब.

चंद्रपूर प्रतिनिधी  :-

जिल्हा कारागृहात आज शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी एका कैद्याची हत्त्या की आत्महत्या यांबाबत संभ्रम असून मिडीयाने यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक खैरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा कारागृह प्रशासनाने प्रसार माध्यमांना दिली नाही. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु शहर पोलीस स्टेशन मधून याबद्दलची अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु अशी घटना घडली असल्याची माहिती चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी पत्रकारांना दिली, मग जिल्हा कारागृह प्रशासनाने ही माहिती चार तास पर्यंत मीडियापासून का लपवून ठेवली? याबद्दलची उलटसुलट चर्चा असल्याने त्या कैद्याची हत्त्या झाली असावी का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाली असता ही माहिती सत्य आहे कां? याची माहिती घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी थेट शहर पोलीस स्टेशन गाठले मात्र शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी अशी घटना घडली आहे पण त्याची सविस्तर माहिती आमच्यापाशी नाही अशी माहिती दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हा कारागृहाला धडक दिली असता त्या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पावेतो कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा कारागृह अधिकारी यांनी दिली नाही परंतु अशी घटना घडली याबद्दल जिल्हा कारागृहात चर्चा सुरू होती.विशेष म्हणजे जिल्हा कारागृहातील एका कैद्याने (?) आत्महत्या केली की त्याची हत्त्या झाली यासंदर्भात संभ्रम असून जिल्हा कारागृहांमध्ये कडेकोट बंदोबस्त असताना एखादा कैदी आत्महत्या कसा काय करू शकतो? व त्याची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास संबंधीत जिल्हा कारागृह विलंब कां करतो ? दुर्घटना घडली याची अधिकृत माहिती संबंधित विभागाने काही अवधीमध्ये प्रसारमाध्यमांना द्यायलाचं हवी? पण ती न देण्याचे कारण काय ? यावर आता कुणीही बोलायला तयार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here