Home चंद्रपूर विशेष :- राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी अत्याधुनिक क्रिडा संकुल ऊभारा,

विशेष :- राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी अत्याधुनिक क्रिडा संकुल ऊभारा,

 

मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांची शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर खेळणारे खेळाडू निर्माण व्हावे व जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा या द्रुष्टीने नवीन चंद्रपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हाडा परिसरातील राखीव जागेत अत्याधुनिक क्रिडा संकुल ऊभारावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शिक्षण क्रीडा राज्य मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ खेळता यावे याकरिता सर्व सुविधायूक्त राष्ट्रीय दर्जाचे क्रिडा संकुल उभारून व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नियुक्त करून होतकरू युवा खेळाडूना संधी उपलब्ध करून द्यावी सोबतच क्रिडा संकुल परिसरात बीओटी तत्वावर गाळे बांधून तरुण बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन
शिक्षण व क्रीडा राज्य मंत्री अदितीताई तटकरे यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here