Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन आता उद्या ऑफ लाइन होणार.

ब्रेकिंग न्यूज :- ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन आता उद्या ऑफ लाइन होणार.

 

शासनाचा नवा अध्यादेश आज पासून लागू उद्या सायंकाळी ५-३० वाजेपर्यंत मूद्दत.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

ग्रामपंचायत निवडणुकीचे बीगुल वाजले असताना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यात आले होते मात्र शासनाच्या नव्या अध्यादेश नुसार ते आता उदयाला ऑफ लाइन भरण्याची मुभा इच्छुक उमेदवारांना मिळणार शिवाय उदयाला दुपारी ३-३० ऐवजी सायंकाळी ५-३०वाजेपर्यंत मूद्दत वाढविण्यात आली आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के आणि २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.आयोगाने संदर्भ क्र.१ येथील दि.११/१२/२०२० रोजीच्या आदेशान्यये माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक २३/१२/२०२० ते दिनांक ३०/१२/२०२० असा आहे. या कालावधीत संगणकप्रणालीव्दारे एकूण ३,३२,८४४ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक २८/१२/२०२० रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (ofline mode)स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दिनांक ३०/१२/२०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here