Home वरोरा धक्कादायक :- वरोरा क्षेत्रातील विद्दुत वाहिन्या उभारणीत शेतकऱ्यांची फसवणूक ?

धक्कादायक :- वरोरा क्षेत्रातील विद्दुत वाहिन्या उभारणीत शेतकऱ्यांची फसवणूक ?

 

दलाल, अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने कोट्यावधीची अफरातफर. अँड अमोल बावने यांच्या माध्यमातून प्रकरण झाले उघड.

महावितरण भ्रष्टाचार भाग-

चंद्रपूर जिल्ह्यात विद्दूत वाहिन्या व सोबतच टॉवर उभारण्याचे काम महावितरण कंपनीने एका कंत्राटदारामार्फत केले असून शेतकऱ्यांच्या संमती शिवाय काही ठिकाणी टॉवर उभारण्यात आले तर काही शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदलाच दिला गेला नसल्याच्या तक्रारी आहे, याहून कहर म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणीच झाली नसतांना सुद्धा त्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनी कडून मोबदला दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार अँड अमोल बावने यांच्या माध्यमातून समोर आला आहे.

प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यात शेंबळ या गावाच्या चार शेतकऱ्यांच्या शेतात महावितरण कंपनीने टॉवर उभारणी चे काम कंत्राटदाराला दिले, या कामामध्ये विद्दूत टॉवरमुळे बाधित जमिनीचा मोबदला महावितरण कंपनी तर्फे काही शेतकऱ्यांना देण्यात आला मात्र अजूनही काही शेतकरी या लाभा पासून वंचित झाला असल्याने व शेतकऱ्यांची हाक कुणी ऐकून घेण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या वतीने अँड अमोल बावने यांनी न्यायालयात व महावितरण कंपनी प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला या संदर्भात प्रत्यक्षात पाहणी केली असता महावितरण कंपनीने ज्या शेतकऱ्यांना मोबदला दिला त्या पैकी काही शेतकऱ्यांच्या शेतात महावितरण कंपनीचे टॉवरच लागले नसल्याने शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयानी फसवणूक जमीन अधिग्रहित करणाऱ्या दलाल, महावितरण कंपनी अधिकारी व काही राजकीय पुढारी यांनी केल्याची बाब आता उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी अँड अमोल बावने यांनी शेतकऱ्यांच्या वतीने लढा उभारला असून कोट्यावधी रुपयांच्या अफरातफरीमधे समाविष्ट सगळ्याची चौकशी करावी व दोषींवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी महावितरण कंपनी व ग्रूह विभागाकडे करण्यात आली आहे. आता या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांचे धाबे दणाणले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here