Home चंद्रपूर खळबळजनक :- डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे रहस्य कुठे दडलय?

खळबळजनक :- डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे रहस्य कुठे दडलय?

 

महिन्याभरात पोलीसांचा तपास कुठल्या दिशेने ?

चंद्रपूर:-

तब्बल महिनाभरानंतरही आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत पोलीस तपासात अल्प प्रगती दिसत आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडून चार दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रपरिषदेत डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष उघड झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले, मात्र डॉ.शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणातील विविध अहवाल प्रतीक्षेत असल्याने व व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत राखून ठेवल्याची माहिती असल्याने डॉ. शीतल यांचा मृत्यूचे रहस्य अजूनही उलगडले नाही.

डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमागचे कारण अजूनही गूलदस्त्यात असताना जून 2020 मध्ये डॉ. शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी नवी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली, त्यामुळे जून दरम्यान एका वर्तमानपत्रात व न्यूज पोर्टलवर आलेल्या बातमीचा संदर्भ जुळते का ? हे पाहणे सुद्धा त्या अर्थाने महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. पण डॉ. शीतल यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा करू शकणारे त्यांचे टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा मुंबई प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अल्सर झालेल्या डॉ. शीतल यांच्या पाळीव कुत्र्यांना संपवण्यासाठी त्यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले होते. त्यातील एक रिकामे अँपुल मिळाल्याचा खुलासा चौकशीदरम्यान झाला आहे. मृत्यूसंदर्भातील विविध अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्या काही दिवसांपासून मानसिक ताणात होत्या. यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडून तपास करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here