Home चंद्रपूर महत्वाची बातमी :-पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन?

महत्वाची बातमी :-पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन?

 

विविध मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राज्यातील शासनमान्य यादितील जिल्हा दैनिके व साप्ताहीके तसेच शासनमान्य यादित समावेश होण्याकरिता अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील साप्ताहीकांना विशेष बाब म्हणून २०१७ मध्यबिंदु समजून सरकारी जाहिरात व सर्व न्यूज पोर्टलला ओळखपत्र व जाहिराती देण्यात याव्यात अशी मागणी पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र बहुभाषिक पत्रकार परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनातून करण्यात आली.

या आंदोलनात विविध मागण्या संदर्भात निवेदन तयार करण्यात आले यामधे शासनाने नविन लादलेले २०१८ धोरण जिल्हा वृत्तपत्रांसाठी अन्यायकारक असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एकंदरीत जाहिरातीत झालेला प्रभाव लक्षात घेता विशेषतः शासनाच्या विविध विभागाच्या दर्शनी जाहिराती ‘अ’ व ‘ब’ वृत्तपत्रांनांच देण्यात येतात. त्या पुर्वव्रत जिल्हा वृत्तपत्रांच्या अनेक तपांच्या सेवा पाहता जिल्हा वृत्तपत्रांनाही अग्रक्रमाने देण्यात याव्या तसेच ई-टेंडरिंगचा प्रघात त्यामुळे वृत्तपत्रांना निविदा सुचना व लिलावाचा जाहिराती चुकीची अंगीकारलेली पध्दत दुरूस्त करून प्रत्येक जाहिरात सविस्तरपणेजिल्हा वृत्तपत्रांना देण्यात यावी. अनेक वर्षापासून पण शासनाच्या जाहिरात यादित समावेश नसलेल्या वृत्तपत्रांना विशेष बाब म्हणून यादिवर घेण्यात यावे. पोर्टल न्युज ना वृत्तसंकलनासाठी योग्य त्या सवलती तथा परिचयपत्र देण्यात यावे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव व हलाखीची परिस्थिती पाहता व्दिवार्षीक तपासणी २०२३ मध्येच करण्यात यावी. स्थानिक ईलेक्ट्रॉनिक्स मिडीयाला जे वार्ता प्रसिध्द करतात त्यांना निकषाप्रमाणे अधिस्विकृती पत्र देण्यात यावी. वृत्तपत्रामध्ये शासनाच्या बदलीच्या व जन समस्यांच्या वार्ताचे कात्रण पुर्ववर्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत त्या त्या विभागांना पाठवावी. न्युज पोर्टल चालविणाऱ्यांना निकषाप्रमाणे अधिकृतता बहाल करण्यात यावी.अशा प्रकारच्या मागण्या संदर्भात प्रत्त्येक पत्रकारांनी आपले विचार ठेवले.

याप्रसंगी चंद्रपूर लोकशाही दैनिक चे संपादक श्रीधर बलकी, चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव हरचरण सिंह वधावन, जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार, जेष्ठ पत्रकार हरवीण्दरसिंह धुन्नाजी चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र बलकी अन्वर मिर्झा.राजू बिट्टुलवार, राजू कुकडे, संजय कन्नावार, अशोक जाधव, आशिष रैच, अयूब कच्छी मनोज पोतराजे, खुशाल हांडेहीमायु अली इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleही कसली विघातक पत्रकारिता? जी देशाच्या सार्वभौम अस्मितेला तिलांजली देताहेत.
Next articleसत्तेची दलाली करणारे ते पोलिस अधिकारी यांनी माफी मागेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here