Home चंद्रपूर खळबळजनक :- पत्रकारावर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा महाराष्ट्रभर...

खळबळजनक :- पत्रकारावर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा महाराष्ट्रभर होणार निषेध.

 

खासदार बाळू धानोरकर यांच्यासह त्यांच्या हल्लेखोर आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी.

चंद्रपूर :-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर जिल्हा सरचिटणिस तथा साप्ताहीक भुमीपूत्राची हाक (न्युज पोर्टल) चे संपादक राजू कुकडे यांनी लिहिलेल्या बातमीमुळे भांबावलेल्या खासदार बाळू धानोरकर यांच्या गुंडांनी त्यांच्यावर वरोरा येथे प्राणघातक हल्ला केला यामधे ते सुदैवाने वाचवले पण एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे भाडोत्री हल्ले करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जर ललकारत असेल तर या लोकशाहीला बळकट करणाऱ्या चौथ्या स्तंभातील पत्रकार संघटनांना एकत्र येऊन अशा गुंड प्रवृत्तीला ठेचणे आवश्यक आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात भाडोत्री हल्ले करणाऱ्या खासदार धानोरकर यांच्यासह त्यांच्या गुंडावार पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा राज्याचे ग्रूहमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती संघाचे विदर्भ अध्यक्ष प्राध्यापक महेश पानसे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

“बालिश बहु बायकांत बडबडला”या उक्ती प्रमाणे वाराणसीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी वक्तव्य केल्या नंतर दैनिक सकाळ पोर्टलच्या फेसबुक वर मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल करण्यात आले त्यात त्यांच्या परिवाराला व दारूच्या व्यवसायाला पण टार्गेट करण्यात आले या संदर्भात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर दि.१७ जानेवारीला बातमी प्रकाशित केली होती. मात्र त्या बातमीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात कुठलेही वक्तव्य नसतांना व फेसबुकवर झालेल्या ट्रोलचाच संदर्भ घेत ती बातमी प्रकाशित झाली असतांना खासदार बाळु धानोरकरांनी आपली गुंडगिरी दाखवत ज्या पद्धतीने भूमिपूत्राची हाक न्यजु पोर्टलचे प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांना फोनवरून बातमी अशी का लिहिली? असा प्रश्न करून तुम्हा दोघांनाही चंद्रपूरला भेटतो म्हणून सांगीतले. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांनी संपादक राजु कुकडे यांना फोनवर भेटण्याची व तुम्ही कुठे आहात म्हणून विचारणा केली होती
आणि दिनांक १८/०१/२०२१ ला सायंकाळी ७.०० च्या दरम्यान वरोरा येथील बोर्डा चौकातील हॉटेल राजयोग जवळ त्यांच्यावर गुंडाकरवी प्राणघातक हल्ला केला जो खासदार बाळू धानोरकर यांच्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, त्यामुळे काल दिनांक २० जानेवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर व डिजिटल मीडिया असोसिएशन च्या वतीने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत राज्याचे ग्रूहमंत्री यांना निवेदने देऊन  पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत खासदार बाळू धानोरकर व त्यांच्या गुंडावार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली, या निवेदनाच्या प्रती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, देशाचे ग्रूहमंत्री यांच्यासह काँग्रेस कमेटी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राज्याचे काँग्रेस कमेटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलीया, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय ग्रूह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना देण्यात आल्या, या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे.जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार, डिजिटल मिडिया असोसिएशनचे जितेंद्र चोरडिया राजू बिट्टुरवार,दिनेश ऐकोणकर, मनोहर दोतपेल्ली व इतर  पत्रकार बांधव उपस्थित होते .

Previous articleधक्कादायक ;- राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली याचे उत्तर अनेकांना माहित नाही ?
Next articleमागणी :- संपादक राजू कुकडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार धानोरकर व त्यांच्या गुंडांवर गुन्हे दाखल करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here