Home चंद्रपूर मागणी :- संपादक राजू कुकडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार धानोरकर व त्यांच्या गुंडांवर...

मागणी :- संपादक राजू कुकडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार धानोरकर व त्यांच्या गुंडांवर गुन्हे दाखल करा

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमूर तर्फे तहसीलदार यांच्यामार्फत ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी.

चिमूर ;-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा साप्ताहिक व दैनिक न्यूज पोर्टल भुमीपुत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांच्यावर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडांनी जो भ्याड हल्ला करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला ललकारले आहे ते लोकशाहीला बाधक असून एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे पत्रकारांवर भ्याड हल्ले करीत असेल तर हे लोकसेवक कसले ? असा प्रश्न निर्माण होत असून अशा गुंड प्रवृत्तीच्या खासदार व त्यांच्या गुंडावार पत्रकार सरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रकारची मागणी चिमूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

काल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सदस्य प्रदीप रामटेके यांच्या नेत्रुत्वात दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की ज्या अर्थी राजू कुकडे यांनी आपल्या भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात बातमी लिहिली नव्हती फक्त दैनिक सकाळ न्यूज पोर्टल च्या फेसबुक वरील पोस्ट वर जे ट्रोल करण्यात आले त्याचा संदर्भ घेत ती बातमी होती पण अशिक्षितपणा असलेल्या खासदारांना ती बातमी समजली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या गुंडा कडून संपादक राजू कुकडे यांच्यावर वरोरा येथील राजयोग हॉटेल जवळ प्राणघातक हल्ला केला जो एकूण पत्रकारितेवर हल्ला आहे आणि म्हणून खासदार बाळू धानोरकर व त्यांच्या हल्लेखोर गुंडावर पत्रकार सरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमूर च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघाचे प्रदेश सदस्य प्रदीप रामटेके यांच्यासह तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी, संघटक विलास मोहीनकर, कोषाध्यक्ष सुभाष रामटेके, तालुका सदस्य योगेश अगडे,सुनिल हिंगणकार इत्यादींनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन ग्रूहमंत्र्यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here