Home चंद्रपूर लक्षवेधी :- आमदार किशोर जोरगेवार साहेब दारूचे सोडा, जमलस तर थकीत वीज...

लक्षवेधी :- आमदार किशोर जोरगेवार साहेब दारूचे सोडा, जमलस तर थकीत वीज बिलाचे बघा.

 

लॉक डाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलामुळे वीज ग्राहकांना शॉक, आता सक्तीची वीज बिल वसुली याकडे जोरगेवारची डोळेझाक?

लक्षवेधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते मात्र त्या वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेले वायू प्रदूषण यामुळे जिल्ह्यातील जनतेला दमा अस्थमा आणि त्वचेचे विविध आजार होत असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊन अतिरिक्त खर्च आरोग्यावर होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जनतेच्या या गंभीर प्रश्नाला जर आंदोलनात उतरले तर हमखास आपल्याला राजकीय यश मिळू शकते हा धागा पकडून आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट वीज बिल शासनाने माफ करावे कारण हा आमचा अधिकार आहे असे निवडणूक शस्त्र उगारूण आपल्या निवडणूक विजयाचे त्यांनी गणित जुळवले व जनतेचा विश्वास जिंकत विधानसभा निवडणूक त्यांनी मोठ्या फरकाने जिंकली, महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत मोठमोठ्या होर्डिंग वर 200 युनिट वीज बिल माफीचा मुद्दा जनतेला भारावून टाकला असल्यानेच जनतेने त्यांना निवडून दिले,

आज किशोर जोरगेवार यांना आमदार होऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ झाला पण 200 युनिट वीज माफी तर झाली नाहीच उलट लॉक डाऊन च्या कोरोना काळात सरकारने जवळपास 18 ते 20 टक्के वीज दर वाढ केली आणि याच काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारल्यामुळे जनतेला वीज दरवाढीचा शॉक लागला असल्याने त्यांच्यात आक्रोश निर्माण झाला आहे.मात्र  आमदार किशोर जोरगेवार हे त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे, नव्हे जनतेसोबत एक प्रकारे त्यांनी दगा फटका सुरू केला आहे, अशी जनसामान्यांमधे ओरड सुरू झाली आहे.

200 युनिट वीज बिलाच्या मुद्द्यावरून किशोर जोरगेवार यांना या विरोधकांनीही घेरले आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बैनेर वरील तोंडाला काळे फासले व आपला रोष व्यक्त केला, पण इकडे आता ‘ महावि तरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसुल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश ‘महावितरण’ने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वीज ग्राहक हे अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याने व काहीकांचे वीज बिल थकीत असल्याने ते चिंतेत आहे मग किशोर जोरगेवार नेमके करत का आहे ? हा प्रश्न चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे.

डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे असे महावितरणचे म्हणणे आहे व आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असं ‘महावितरणकडून जाहीर करण्यात आलं आहे.
या संदर्भात राज्यातील वाढीव वीज बिल किमान माफ व्हावं अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती पण आता विद्दूत पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवली जात असताना सुद्धा आमदार किशोर जोरगेवारजर हातावर हात धरून जनतेचा वीज पुरवठा खंडित होतांना बघत राहणार तर मग खरंच किशोर जोरगेवार यांना आमदार पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा प्रश्न जनता विचारतांना दिसत आहे.

मग किशोर जोरगेवार पेक्षा रोहित पवार बरे.

एकीकडे सरकारकडून 200 युनिट वीज बिल माफी बद्दल आक्रमक आमदार किशोर जोरगेवार आता थंड झाले असून त्यांना चंद्रपूर मधे दारू येते कशी ? याची चिंता आहे आणि त्यामुळे त्यांनी अवैध दारू पकडण्यासाठी अनेक पथक निर्माण केले जणू यांना पोलीस स्टेशन चा अतिरिक्त कार्यभार दिला आहे आणि त्या पथकाकडूनच माहिती मिळाल्याने त्यांनी जवळपास 1 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल पडोली पोलीस स्टेशन च्या हद्दीत पकडला आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली पणदारूचे सोडून वीज बिल शक्तीच्या वसुली चे त्यांनी बघायला पाहिजे, कारण कुठलेही आश्वासन दिले नसतांना आमदार  रोहित पवार हे शक्तीच्या वीज बिलाबाबत गंभीर आहे व थकित वीज बिलाच्या कारवाईबाबत रोहित पवारांनी राज्य सरकार समोर काही सवाल उपस्थित केले आहे. वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला, तेवढेच बिल द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा, असंही रोहित पवारांनी राज्य सरकारला सुचवलं आहे.त्यामुळे जोरगेवार पेक्षा रोहित पवार बरे असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here