Home वरोरा संपादक राजू कुकडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करा.

संपादक राजू कुकडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करा.

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा वरोरा तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

वरोरा वृत्तसेवा :-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार राजूभाऊ कुकडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीना अटक करून त्यांचेवर पत्रकार संरक्षण कायदातंर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ वरोरा शाखेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ कुकडे यांनी आपल्या ‘भूमिपुत्रांची हाक ‘ या पोर्टलवरून जिल्हयाचे खासदारांबाबत बातमी प्रकाशित का केली, म्हणून 18 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास बोर्डा चौकातील राजयोग हॉटेल जवळ काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या वेळी त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली असून राजू कुकडे यांनी हॉटेलमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा जीव वाचला.

राजू कुकडे यांच्यावर प्राणघातक व भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा आम्ही पत्रकार बांधव निषेध व्यक्त करीत असून बातमी लिहीण्या वरून हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पोलीस विभागाने तात्काळ अटक करून त्याचेवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा वरोरा तर्फे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे .
उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत मागण्याचे हे निवेदन तहसीलदार रमेश कोळसे व वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दीपक खोब्रागडे यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे गृहमंत्री व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here