Home चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांची रुजू झाल्यापासून दमदार कामगिरी.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांची रुजू झाल्यापासून दमदार कामगिरी.

 

अवैध दारू संदर्भातील त्यांच्यावरील आरोप राजकीय ? असे दबंग पोलीस अधिकारी जिल्ह्यात हवेच.

चंद्रपूर विशेष वार्ता :-

जिल्ह्यात राज्याचे ग्रूह मंत्री अनिल देशमुख यांच्या राजकीय दौऱ्याच्या निमित्याने राजकीय वातावरण पेटले आहे आणि त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांच्यावर कारवाई करा मागणी आमदार किशोर जोरगेवार हे करणार असल्याची चर्चा आहे,खरं तर जिल्ह्यात दारूबंदी ही कुणाच्या फायद्यासाठी आहे व त्याचा सर्वात मोठा फायदा कोण घेत आहे हे सर्वश्रुत आहे, पण दारूच्या अवैध विक्री व पुरवठ्या बद्दल नेहमी पोलिसांनाच टार्गेट का केल्या जाते ? हेच कळत नाही. कारण पोलीस कितीही प्रामाणिक असले तरी राजकीय सत्ताधारी यांचे वरदहस्तापुढे त्यांचे काही एक चालत नाही ही वस्तुस्थिती आहे. विशेष बाब म्हणजे राजकीय नेत्यांचे व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे अवैध धंदे असल्याने पोलिसांना ते सांभाळून घ्यावं लागत.कारण त्यांचा तसा पोलिसांवर दबाव असतो  पण सर्वसामान्यांना वाटत की यासाठी पोलीसच जबाबदार आहे.काही वेळा  एखादा राजकीय कार्यकर्ता अवैध धंद्यात पकडला गेला तर हेच राजकीय नेते लोकप्रतिनिधी पोलिसांना फोन करून आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून दबाव आणतात तर मग लोकप्रतिनिधींना पोलिसांवर आरोप लावण्याचा अधिकार तो काय ?

आमदार किशोर जोरगेवार यांनी दारूचा अवैध साठा पकडला व तो पोलिसांच्या स्वाधीन केला दरम्यान त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांना फोन केला तर त्यांनी पोलीस स्टेशन ला माहीती द्या असे उत्तर दिले पण आमदार किशोर जोरगेवार यांना ही बाब खटकली आणि त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांच्याविरुद्ध एल्गार पुकारला, पण खरं तर ते सरळ जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पण फोन करू शकले असते, कारण स्थानिक गुन्हे शाखेचे कार्य केवळ दारू पकडणे नव्हे तर जिल्ह्यातील ज्या गुंतागुंतीच्या घटना आसतात ज्या स्थानिक पोलीस स्टेशन मधून सोडवल्या जात नाही त्यासाठी ही शाखा काम करते.

बल्लारपूर येथे झालेला सूरज बहुरीया याची मर्डर केस असो की मनोज अधिकारी यांची मर्डर केस असो ह्या दोन्ही केस मधे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांनी आपली दबंगगिरी दाखवून अवघ्या काही दिवसातच फरार आरोपींना पकडले. त्यामुळे त्यांच्या दमदार कामगिरीने गुंडगिरीला चोप बसला आहे, महत्वाची बाब म्हणजे गुन्ह्याचा खरा शोध घेणे हे स्थानिक गुन्हे शाखेचे काम असताना केवळ एका दारूच्या प्रकरणात त्यांनी सहकार्य दिले नाही म्हणून त्यांची बदली करा किंव्हा त्यांना निलंबित करा.अशी मागणी म्हणजे केवळ आपला राग व्यक्त करण्याची भूमिका आहे. जिल्ह्यात अवैध दारूच्या विषया पेक्षा असंख्य विषय आहे जे लोकप्रतिनिधींनी सोडवले पाहिजे अर्थात अवैध दारू वर लगाम सुद्धा जरूरी आहे पण त्यात राजकीय नेतेच सामील असेल तर मग पोलिसांना दोष देवून फायदा तो काय ? त्यातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे हे आता जेमतेम दिवाळी च्या दरम्यान आले आणि लगेच ते भ्रष्ट आहे किंव्हा त्यांच्यामुळे अवैध धंदे सुरू आहे असा त्याचा अर्थ होत नाही लोकप्रतिनिधी म्हणून किशोर जोरगेवार यांनी ही बाब समजून घेणे आणि पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन जनकल्यानांची कामे करणे सार्थक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here