Home चंद्रपूर अभिनंदनिय:- जेष्ठ साहित्यकार तथा व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांना विदर्भरत्न पुरस्कार.

अभिनंदनिय:- जेष्ठ साहित्यकार तथा व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांना विदर्भरत्न पुरस्कार.

 

वरोरा शहराची साहित्य क्षेत्रात मान उंचावली सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव.

चंद्रपूर :-

रा. पै. समर्थ समितीच्या वतीने २०२१ या वर्षाचे विदर्भरत्न व नागपूररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले. वरोरा येथील जेष्ठ साहित्यकार तथा व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांना विदर्भरत्न पुरस्कार.अमरावतीचे मराठी नाट्य व चित्रपट कलावंत श्रेयस जाधव व गडचिरोलीच्या महिला उद्योजक प्राजक्ता आदमने कारू यांना विदर्भरत्न, तर नागपूरचे हिमांशू बागडे यांना नागपूररत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ येत्या ३० जानेवारीला सायंकाळी ६ वाजता गरोबा मैदान येथील डॉ. दळवी स्मारक रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या सभागृहात होणार आहे, या पुरस्कार सोहळ्याला महापौर दयाशंकर तिवारी आणि आमदार ऍड. अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी रुग्णालयाचे अध्यक्ष बलबीरसिंग रेणू सुद्धा उपस्थित राहतील.

वरोरा येथील जेष्ठ साहित्यकार तथा व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांना विदर्भरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने वरोरा शहराची मान गर्वाने उंचावली असून साहित्य क्षेत्रात त्यांच्या सर्वोच्य योगदानाबद्दल त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अंशीच्या उंबरठ्यावर असतांना सुद्धा आधुनिक युगाचा वेध घेत त्यांनी फेसबुक वर आपले खाते खोलून आपल्या साहित्य क्षेत्राचा वसा जौपासला आहे आणि त्यावर वेगवेगळे प्रबोधनपर विचार व्यंगचित्राच्या माध्यमातून ते ठेवत असून चालू घडामोडी बद्दल सुद्धा ते आपले विचार ठेवून चुकीच्या मथळ्यावर प्रहार करीत आहे, आज दिनांक २३ जानेवारीला जयवंत काकडे यांचा वाढदिवस असून त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल संपादकीय मंडळाद्वारे शुभेच्छा ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here