Home चंद्रपूर धक्कादायक :- काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा जावई शोध म्हणे आमदार, खासदारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर...

धक्कादायक :- काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा जावई शोध म्हणे आमदार, खासदारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर कारवाई करा,

 

मग गुंडांना पाठवून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या खासदार यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्याची मागणी करा ना?

लक्षवेधी :-

सद्ध्या काँगेसच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्या क्रांतिकारी शहीदांचे  विस्मरण झाले असून काँग्रेस च्या नावावर आपली राजकीय दुकानदारी चालविणाऱ्यांची फौज तयार झाली आहे. कारण त्यांना देशहित दिसत नसून आपली राजकीय पोळी कुठे भाजता येईल याची फार चिंता असते आणि म्हणूनच एकेकाळी पत्रकार म्हणून मिरविनाऱ्या  विलास टिपले यांनी ज्या पद्धतीने खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थनार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून राजू कुकडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली ती विलास टिपले यांच्या पत्रकारितेचे धिंडवडे काढणारी मागणी असून त्यांची पत्रकारिता केवळ चाटूकारीता होती का ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कुणाच्या पायाशी किती लोटांगण जावं याची मर्यादा सोडलेल्या विलास टिपले यांना भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर असे कुठले आक्षेपार्ह वाक्य मिळाले माहीत नाही पण त्यांनी एकतर बातमी नीट वाचली नसावी किंव्हा त्यांना बातमी वाचता किंव्हा लिहिता येत नसावी असेच कुणीही सच्चा पत्रकार म्हणेल.

चंद्रपूरहून प्रकाशित एका न्यूज पोर्टल वर चंद्रपूरचे खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या बद्दल आपत्तीजनक,अश्लाघ्य व बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला. व तो मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयात वायरल करण्यात आला.राजकीय द्वेषातून हा प्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात येते असे विलास टिपले यांनी जारी केलेल्या प्रेस नोट मधून सांगितले. पण विलास टिपले यांची मती मंद झाली की त्यांनी आपले अस्तित्व संपविले हेच कळत नाही कारण ज्या फेसबुक वरील सकाळ न्यूज पोर्टलवर वाराणसीत जावून खासदार बाळू धानोरकर यांच्या लढण्याच्या घोषणाची खिल्ली उडवली त्याची लिंक स्वतः विलास टिपले यांनी फेसबुक वर टाकली होती आणि त्यामुळेच फेसबुक वरील मित्रांना ही माहिती झाली, ज्यांना खासदार धानोरकर यांना मोठ्या प्रमाणात फेसबुकवर ट्रोल केले हे माहीत नव्हते ते विलास टिपले यांनीच माहीत करून दिले अर्थात खासदार धानोरकर व त्यांच्या पत्नी विषयी माहितीचे ट्रोल हे प्रथमतः विलास टिपले यांनी मोठ्या प्रमाणात जनतेसमोर आणले आणि त्यामुळे त्या ट्रोलची बातमी बनली ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्या हातून मोठी घोडचूक झाली याचे शल्ल्य असलेल्या विलास टिपले यांनी त्याची भरपाई म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन स्वतःची इभ्रत वाचवली हे वाचकांनी समजून घेणे आवश्यक आहे

कदाचित विलास टिपले यांना माहीत नसावे की खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात अगोदरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर च्या वतीने निवेदन देऊन पत्रकार सरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली एकढेच नव्हे तर काँग्रेस कमेटी राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे सुद्धा अशा गुंड खासदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती पण आता पायाखालची वाळू घसरत असल्याची चाहूल लागताच खासदार धानोरकर यांनी आपली चाटू चमच्याची फौज बाहेर काढली असून त्यांच्या माध्यमातून आपली इभ्रत वाचवीण्याची मोहीम राबविलेली दिसत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून विलास टिपले यांना समोर करून राजू कुकडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे जो खासदार बाळू धानोरकर यांच्याच अंगलट येणार असल्याचे जानकरांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here