Home चंद्रपूर मनसे इशारा :- चंद्रपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांची वाढीव वीजबील भरण्यासाठीची सक्ती तात्काळ...

मनसे इशारा :- चंद्रपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांची वाढीव वीजबील भरण्यासाठीची सक्ती तात्काळ थांबवा,

महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यास मनसेचे निवेदन सक्तीची वीज बिल वसुली केल्यास  मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा.

चंद्रपूर :-

गेल्या वर्षभरापासुन महाराष्ट्रभर थैमान घातलेल्या कोरोना सारख्या महाभंयकर व्हायरसचा प्रकोप थांबविण्यासाठी किमान ७-८ महिने लाॕकडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या हाताला काम नव्हते, त्यामुळे अगोदरच सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यातुन परिस्थिती थोडी सावरत असताना त्यात महावितरण कंपनीने लाॕकडाऊन काळातील थकीत वाढीव वीजबील भरण्यासाठीची सक्तीची वसुली मोहिम राबवली आहे व वीज ग्राहकांना नोटीस देऊन १५ दिवसात वीज बिल सरसकट न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे, एवढेच नव्हे तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित सुद्धा केला आहे, त्यातच वीज बिल थकीत असलेल्या वीज ग्राहकांना वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी उर्मट व अरेरावी च्या भाषेत उत्तर देऊन नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात वीज ग्राहकांना वीज दरात सूट मिळायला हवी होती, उलट जवळपास १८ ते २० टक्क्यांनी वीज बीलात वाढ करण्यात आली आहे, आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ३०० युनिट वीज बीलापर्यंत ३० टक्के सूट देण्याची घोषणा केली असतांना स्वतः शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना वीज बीलात सूट न देता उलट त्यामधे मोठी वाढ होते कशी ? हा गंभीर प्रश्न असून चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार किशोर जोरगेवार यांनी तर २०० युनिट वीज माफ करायला सरकारला भाग पाडू अशी गर्जना करून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आशा दाखवली होती पण आता मात्र सर्व राजकीय सत्ताधाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या या गंभीर प्रश्नाला बगल देवून एक प्रकारे वीज ग्राहकांसोबत धोकाधडी चालवीलेली आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही, त्यामुळे महावितरण कंपनीने वीज ग्राहकांसोबत शक्ती न करता वाढीव वीज बिल वगळता जुन्या बीलाच्या दराने वीज दर आकारूण सर्वसामान्य ग्राहकांना वीज कनेक्शन कापून नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वीज ग्राहकांच्या हक्कासाठी मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल दरम्यान काही अनुचित प्रकार झाल्यास आपली कंपनी जबाबदार असेल.असा इशारा महावितरण मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला, याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार, जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ कुकडे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, शहर संघटक मनोज तांबेकर, वाहतुक सेना जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता, महिला शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकुर, रमेश कालबान्धे, पियुष धूपे, सुनील गुडे, क्रिष्णा गुप्ता रूग्णमित्र प्रविन शेवते चेतन्या सधापडे इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleमनसे इशारा :- चंद्रपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांची वाढीव वीजबील भरण्यासाठीची सक्ती तात्काळ थांबवा,
Next articleखळबळजनक ;- खासदार धानोरकरांचा खासमखास अशोक मत्ते खंडणी गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here