Home चंद्रपूर खळबळजनक ;- खासदार धानोरकरांचा खासमखास अशोक मत्ते खंडणी गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात,

खळबळजनक ;- खासदार धानोरकरांचा खासमखास अशोक मत्ते खंडणी गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात,

 

आरटीओच्या ४० हजार रूपयांच्या लाच प्रकरणात अशोक मत्तेला अटक.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागातून (आर.टी.ओ.) ४० हजार रूपयांची लाच मागण्याच्या आरोपाखाली प्रजासत्ताक दिनी पत्रकारांना ‘ब्लॅकमेलर’ म्हणणाऱ्या अशोक मत्ते याचेवर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल उशिरा चंद्रपूरात घडली. वृत्त लिहीस्तोवर रामनगर पोलिसांनी पत्रकारांना एफआयआर च्या प्रती उपलब्ध करून दिलेल्या नाही हे विशेष.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांच्या नावाने ही रक्कम मागितली गेल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पोलिसांनी त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. ज्या अशोक मत्ते यांचेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो अशोक मत्ते राजकारणामध्ये सक्रिय असून जिल्ह्यातील खासदार बाळू धानोरकर या मोठ्या नेत्याच्या पैशाची तो उलाढाल करीत असल्याचे सांगीतल्या जाते. अवैध मार्गाने व चुकीच्या पद्धतीने पैसा जमा करण्याची होड’च जणू आज जिल्ह्यामध्ये लागलेली आहे. रेती-दारू -कोळसा, सुगंधित तंबाखू हे स्वतःला पुढारी समजणाऱ्यांनी ‘धन’ कमाविण्याचे साधन बनविले आहे. बरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाचा वापर करण्याचा आणि स्वतःचे घर भरण्याचे अनैतिक कार्य आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचे अशोक मत्ते हे उत्तम उदाहरण होय !

स्थानिक आमदारांच्या म्हणण्यावरून अशोक मते आरटीओ विभागात गेला या चर्चेला आज जिल्ह्यामध्ये पेव फुटले होते. यासंदर्भात आम. किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया एका प्रतिनिधींनी घेतली असता त्यांनी ‘माझे नांव यामध्ये फुकट गोवल्या जात आहे. तो माणूस खासदार बाळू धानोरकर यांचा आहे व हे साऱ्यांनाच माहित आहे, पण जिल्ह्यात काहीही झाले तरी किशोर जोरगेवार हे नांव समोर केल्या जाते.’ अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

पत्रकारांना ‘ब्लॅकमेलर’ म्हणणाऱ्या अशोक मत्ते यांनी खासदारांच्या नावाने अनेकांना ब्लॅकमेलर’ करून स्वतःचे ‘घर’ भरण्याचे लाजिरवाणे व्यवसाय ते करीत होते अशी चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरात साप्ता. भुमिपूत्राची हाक चे संपादक राजु कुकडे यांचेबर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात बातमी (बेअकल्लांना न समजणारी, त्यांच्याचं बाजुने असलेले बृत्त) लिहील्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला. त्याची तक्रार वरिष्ठ स्तरापर्यंत करण्यात आलेली आहे. मात्र आता अशोक मत्ते चे ब्लॅकमेल प्रकरण लोकशाहीसाठी मारक असून जनतेने आपले लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना पवित्र संसदेत पाठविले तेचं आज स्वतःला ‘राजे’ समजत आहे. दक्षिण कोरिया च्या किम जोन उंग’ समजण्याचे प्रकार जिल्ह्यात तरी घडू नये, अशी सामान्यजणांची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here