Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- पोलीस कस्टडी वाचविण्यासाठी खंडणी गुन्ह्यातील अशोक मत्ते रुग्णालयात ?

ब्रेकिंग न्यूज :- पोलीस कस्टडी वाचविण्यासाठी खंडणी गुन्ह्यातील अशोक मत्ते रुग्णालयात ?

 

नागपूर मेडिकल टीमने चेक केल्यास खरी परिस्थिती येणार समोर,

चंद्रपूर ब्रेकिंग

खासदार यांची आर्थिक बाजू सांभाळणारा कांग्रेस नेता चक्क 40 हजार रुपयांसाठी पोलिसांच्या तावडीत सापडला असून आपली पोलीस कस्टडी वाचविण्यासाठी त्यांनी चक्क छातीत दुखत असल्याचे कारण सांगून जिल्हा सामन्य रुग्णालय येथे प्रवेश मिळविला आहे, परंतु जर नागपूर मेडिकल टीम ने या संदर्भात आरोग्य चाचणी केली तर यामागचे गुपित समोर येऊ शकते अशी चर्चा आहे,

खासदार यांचं नाव सांगून अशोक मत्ते यांनी आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षक जिल्लावार यांना मला महिनेवारी पैसे हवे अशी मागणी करीत असल्याची बाब आता त्यांच्यावर जिल्हा स्टेडियम जवळ झालेल्या ट्रैपमुळे स्पष्ट झाली असून जिल्ह्यात आता आपलेच राज आहे, खासदार आमदार आपलेच आहे, तुमचे धंदे काय हे मला माहिती आहे, मला पैसे न दिल्यास तुमची व आरटीओ विभागाची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी लावू असा दम त्या अधिकाऱ्याला मत्ते यांनी दिला असल्याचा खुलासा होतांना दिसत आहे.

मात्र वाहन निरीक्षक जिल्लावार यांनी सततच्या त्रासाला कंटाळून अशोक मत्ते यांची तक्रार जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना दिली, साळवे यांनी प्रकरणाबाबत सखोल माहिती गोळा करीत तसा सापळा रचला व स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती न देता कोठारी येथील सपोनि चव्हाण यांच्या नेतृत्वात चमूचे गठन केले व जिल्हा स्टेडियम जवळ जिल्लावार यांनी मत्ते ला 40 हजार रुपये देण्यासाठी गेले असता सापळा रचून असलेल्या पोलीस चमूने अशोक मत्ते ला रंगेहात अटक केली.

याआधी राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष कक्कड हे सुद्धा आरटीओ विभागाला त्रास देत होते त्यावेळी खुद्द आरटीओ अधिकारी शिंदे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा नोंदविली होती पण राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांनी पाठराखण केल्याने तेंव्हा कक्कड वाचले पण अशोक मत्ते हे मात्र पोलिसांच्या ट्रैप मधे फसलेच मात्र आता आपली पोलीस कोठडीत हवा टाईट होईल या भीतीने त्यांच्या छातीत दुखत असल्याचा बहाणा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी शरण घेतली असल्याची माहिती आहे.

Previous articleखळबळजनक ;- खासदार धानोरकरांचा खासमखास अशोक मत्ते खंडणी गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात,
Next articleवीज ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह उर्जा सचिव व महावितरण कार्याकारी संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here