Home चंद्रपूर धक्कादायक ;- DNR ट्रॅव्हल्स मध्ये 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग?

धक्कादायक ;- DNR ट्रॅव्हल्स मध्ये 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग?

ट्रव्हल्स मालकांवर गुन्हा दाखल करा,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

DNR ट्रॅव्हल्स मध्ये 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली असून
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ट्रव्हल मालकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

DNR ट्रॅव्हल्सच्या संचालकाकडून सर्व नियम धाब्यावर बसवून ट्रव्हल प्रवासी वाहतूक होत आहे काही महिन्यापूर्वी या ट्रव्हल्स मधे दारू वाहतूक सुद्धा झाली होती त्यामधे खुद्द मालकाला अटक झाली होती आणि आता या ट्रव्हल्स मधे युवतीचा विनयभंग झाला असल्याने या DNR ट्रॅव्हल्स मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या गाड्यांचे परमिट रद्द करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी निवेदनातून केली आहे.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे,महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे,शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके,शहर उपाध्यक्ष वाणी सदलावार,वर्षा भोमले, शहर संघटक मनोज तांबेकर,तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, सुयोग धनवलकर आदी उपस्थित होते.

Previous articleदुःखद घटना :- एका प्रेमी युगलांनी केली रेल्वे रुळावर आत्महत्या.
Next articleमनसे इशारा :- सिद्धपल्ली व्यवस्थापन व कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- मनसेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here