Home चंद्रपूर सनसनीखेज :- भूमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांचे फेसबुक अकाऊंट हैक.

सनसनीखेज :- भूमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांचे फेसबुक अकाऊंट हैक.

 

फेसबुक मित्रांनी कुणाच्याही फेसबुक मेसेंजर वर आलेल्या पैशाच्या मागणीवरून पैसे देऊ नये राजू कुकडे यांचे आवाहन.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :

देशात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असून फेसबुक, बैंक अकाउंट, फोन पे. गूगल पे हैक करून पैशाचा व्यवहार व पैसे अकाउंट मधून परस्पर काढण्याच्या तक्रारी होत असतांना आता फेसबुक अकाउंट हैक करून पैशाची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असून भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक यांची फेसबुक आयडी हैक करून फेसबुक मित्रांना मेसेंजर वरून पैशाची मागणी काल पासून होत असल्याची माहिती आहे, यासाठी फेसबुक हैक करणाऱ्या व्यक्तींनी काल व्हॉटसअप वरून फेसबुक पेज वर माहिती मिळविण्यासंदर्भात फेसबुक पोस्ट टाकली होती व त्यात क्लिक करा असे लिहिले होते अशा प्रकारच्या अनेकांच्या फेसबुक आयडी हैक होणार असल्याची शंका नाकारता येत नाही त्यामुळे माझ्या फेसबुक मित्रांनी क्रुपया कुठल्याही राजू कुकडे नावाच्या नव्या फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारू नये व आर्थिक मागणी केल्यास त्याचे फोन पे गूगल पे क्रमांक घेऊ नये असे आवाहन राजू कुकडे यांनी आपल्या फेसबुक मित्रांना केले आहे.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूर शहरात पुन्हा 26 वर्षीय युवकाचा खून.
Next articleधक्कादायक :- सेवानिवृत्त होत असतांना संवर्ग विकास अधिका-याचा अफलातून प्रताप?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here