Home वरोरा धक्कादायक :- सेवानिवृत्त होत असतांना संवर्ग विकास अधिका-याचा अफलातून प्रताप?

धक्कादायक :- सेवानिवृत्त होत असतांना संवर्ग विकास अधिका-याचा अफलातून प्रताप?

 

रजा प्रवास सवलतीचे बिलावर शेवटची सही न केल्याने ३७७ शिक्षकांवर अन्याय.

वरोरा न्यूज नेटवर्क :-

पंचायत संमिती वरोराच्या २८ फेब्रुवारी ला सेवानिवृत्त झालेल्या संवर्ग विकास अधिका-यांनी सर्व प्रकारे बिल वारंवार तपासून त्रुटीविरहीत केल्यानंतर व लेखाविभागाने यासाठी कॕशबुकची ३२ पानं रंगवून पेड अॕन्ड कॕन्सल शिक्यावर सहाय्यक लेखाधिका-याच्या सह्या झाल्यानंतरही २५ फेब्रुवारी ला तयार झालेल्या चेकवर या अधिका-याने चेकवर सह्या करण्यास नकार देवून पळ काढला असल्याने या अधिका-याच्या या प्रतापामुळे पंचायत समिती वरोराच्या ३७७ शिक्षकांचे एकूण (२४,६९०००) चोविस लक्ष एकोणसत्तर हजार रु. चे रजाप्रवास सवलत बिल जो शिक्षकांचा न्याय हक्क आहे त्यावर पाणी फेरण्याचे काम केलेले आहे . या प्रतापामुळे केवळ शिक्षकच नाही तर चक्क लेखा विभागही अडचणीत सापडला आहे . अजूनही शिक्षकांचे माहे जानेवारीचे पगार बिल तयार असूनही केल्या जावू शकत नाही कारण २५ फेब्रुवारी च्या तयार असलेल्या चेकचा निकाल लागल्याशिवाय फेब्रुवारी चे अकाऊंट क्लोज करता येणार नाही व फेब्रुवारी क्लोज झाल्याशिवाय जानेवारीच्या पगाराचे चेक तयार होणार नाही . या प्रकरणाचा निकाल लागल्याशिवाय शिक्षण विभागातील कोणतेही बिल नियमानुसार पास करताच येवू शकत नाही . नव्याने रुजू झालेले सहाय्यक गटविकास अधिकारी सध्याचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी यांची २५ फेब्रुवारी च्या चेकवर सह्या करण्यास नियमानुसार अडचण झाली आहे . हे प्रकरण निकाली निघण्यासाठी दोनच पर्याय आहेत मागिल तारखेत सेवानिवृत्त अधिका-याने मागिल तारखेत सह्या करणे किंवा कॕशबुक ची ३२ पानं व सर्व चेक रद्द करणे . ईतक्या मोठ्या संख्येत कॕशबुकची पानं रद्द करणे ही गंभिर बाब असून निश्चितच लेखाविभागावर आॕडीट पॕराचे संकट उभे झाले आहे . या पळपुट्या अधिका-याच्या या प्रतापामुळे शिक्षकांसोबतच लेखाविभागाचेही कर्मचारी अडचणीत सापडले आहे .*
*रजा प्रवास सवलतीच्या चेकवर या अधिका-याने जाता जाता सही न करण्याचे कारण म्हणजे एक शिक्षक संघटनेचा बडबोल्या नेता , काही जिल्हा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व अधिका-यांची दलाली करणारे काही एजंट कारणीभूत असल्याची चर्चा आहे . शिक्षकांचे सदर रजाप्रवास बिल पारित व्हावी यासाठी गेल्या दिड वर्षांपासून दिवसरात्र एक करणारी अखिल वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघ , वरोरा या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून येत्या १० मार्च पासून पं. स. वरोरा येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे . वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यास संघटना मागेपुढे पहाणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष धनराज रेवतकर , संघटना सचिव विजय परचाके व कार्याध्यक्ष मनोहर पानघाटे यांनी कळविले आहे .

Previous articleसनसनीखेज :- भूमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांचे फेसबुक अकाऊंट हैक.
Next articleधक्कादायक :- उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सहनिबंधक व सहाय्यक निबंधकावर कारवाई होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here