Home भद्रावती धक्कादायक :- उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सहनिबंधक व सहाय्यक निबंधकावर कारवाई होणार?

धक्कादायक :- उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सहनिबंधक व सहाय्यक निबंधकावर कारवाई होणार?

 

आयुध निर्माणी सहकारी पत संस्थेच्या भ्रष्टाचारी संचालकांना वाचविण्याच्या नादात अधिकारी गोत्यात.

भ्रष्टाचारी संचालक समिती भाग-४

चांदा आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांची सहकारी पत संस्था मोठ्या विवादात सापडली असून जवळपास २७०० सभासद असलेल्या या परसंस्थेत काही सभासदांनी पतसंस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचारांची तक्रार सहाय्यक निबंधक यांच्यासह वरिष्ठांना दिली होती त्यामुळे चौकशी होऊन ५७.९२ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल उपलेखानिरिक्षक रवी मांढळकर यांनी निपक्ष चौकशी करून सादर केला. खरं तर त्यामध्ये संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा प्रस्तापित करण्यात आला त्यामुळे संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालय भद्रावती व जिल्हा उपनिबंधक कार्यालय चंद्रपूर यांनी सदर संचालकांवर पोलीस स्टेशन मधे तक्रार देवून फौजदारी गुन्हे दाखल करणे अभिप्रेत होते, मात्र या सहाय्यक निबंधकानीं पोलीस स्टेशन मधे तक्रार देऊन भ्रष्ट संचालकांवर कुठलीही कारवाई न करता व सभासदांनी मागणी नसताना चाचणी लेखापरीक्षण घेणे ह्या सर्व प्रकरणामुळे काही सभासदांनी मा.उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती,

देशात आणी राज्यात कोविड १९ मुळे न्यायालय बंद असल्याने हे प्रकरण तत्कालीनस्थितीत न्यायप्रविष्ट होते पण त्याचाच फायदा घेत संचालक मंडळांना वाचविण्यासाठी सहनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी मोठी रक्कम घेऊन पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश देऊन एक प्रकारे न्यायालयाचा अवमान केला आहे, त्यामुळे हे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून पैशासाठी सहाय्यक निबंधक व सहनिबंधक यांनी संचालक मंडळाला वाचविण्यासाठी जो उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे व ह्या प्रकरणात छेडछाड करण्यात आली आहे यासाठी संचालक मंडळावर फौजदारी कारवाई तर होईलच पण सहनिबंधक व सहाय्यक तालुका निबंधक यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या भ्रष्टाचारी संचालकांनी स्वतःला वाचविण्यासाठी राजकीय राजाश्रय घेऊन सहनिबंधक. जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक तालुका निबंधक यांच्यावर दबाव टाकून भ्रष्टाचार लपविण्याचा जो प्रकार केला तो आता त्यांच्याच अंगलट येणार असल्याने अधिकारी स्वःता गोत्यात तर येईलच पण संचालकांना २७०० सभासद आता सवाल करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here