Home चंद्रपूर खळबळजनक :- जमनजेट्टी परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी.

खळबळजनक :- जमनजेट्टी परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी.

 

वेकोलि प्रशासन व वन विभागाचे दुर्लक्ष जखमींना नुकसानभरपाई देणार कोण ?

चंद्रपूर न्यूज नेटवर्क:-

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या जमनजेट्टी परिसरात शौचालयास गेलेल्या सुनील लेनगुरे राहणार राजीव नगर व जीवन केवट राहणार लालपेठ यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली असून वेकोलि प्रशासन व वन विभागाचे अधिकारी यांनी या घटनेची दखल घेऊन जखमींना तत्काळ मदत करून दोन नरमादी अस्वलांना पकडून नागरिकांची सुरक्षा करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. एका जखमींच्या नाक डोळे फोडले असल्याची माहिती असून दुसऱ्याच्या हाताला जखम झाली आहे त्या दोन्ही जखमींना रुग्णालय भरती करण्यात आले मात्र जखमींना नुकसान भरपाई कोण देणार याबद्दल संभ्रम कायम आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here