Home भद्रावती ग्रामसभेत हरदोला कोळसा खाण व्यवस्थापनाला गावकऱ्यांनी घेरले.सामाजिक नेते राजू मत्ते यांचा पुढाकार.

ग्रामसभेत हरदोला कोळसा खाण व्यवस्थापनाला गावकऱ्यांनी घेरले.सामाजिक नेते राजू मत्ते यांचा पुढाकार.

 

ग्रामसभेतील मागण्या मान्य केल्याशिवाय कोळसा खाण सुरू करू देणार नाही.गावकऱ्यांचा एल्गार!

भद्रावती न्यूज नेटवर्क :-

हरदोला कोळसा खाण सुरू करण्यासंदर्भात वेकोलि प्रशासन आपली तयारी करीत असली तरी त्या परिसरातील गावांचे पुनर्वसन व गावातील प्रकल्पग्रस्त यांना कंपनीत नौकरी देण्यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाने कुठलेही ठोस पाऊले उचलले नाही त्यामुळे सामाजिक नेते राजू मत्ते यांच्या पुढाकाराने दि.०१/०३/२०२१ रोज सोमवारला ठिक ८.०० वा. मौजा चालबडी(को) पो.कॉढा ता.भद्रावती जि.चंद्रपुर येथे सचिन वामन पाचभाई यांचे प्रांगणात गावक-यांची ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती.त्यात ज्ञानेश्वर रामदास मते (माजी सरपंच) यांची ग्रामसभा अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली.

या ग्रामसभेत खालील प्रमाणे ठराव पारीत करण्यात आले.
*सर्वानुमते असे ठरविण्यात आले कि, कांढा, हरदोला खदान सुरु करण्याचा प्रस्ताव प्लैनिग ऑफीसर पवार (माजरी एरीया) यांनी सुनावणी केलेल्या अटी नामंजुर करण्यात आल्या व ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.*सरासरी तिन वर्षापर्यंतच्या विक्रिच्या व्हॅल्युवेशनच्या विक्रीनुसार चार पट शेतीचा मोबदला व ३००००/- रु दरमहा मानधन प्रती वर्ष ३००/- रु वार्षीक वाढ २५ वर्षापर्यंत देण्याचे सांगण्यात आले होते ते गावक-यांनी नामंजुर केले. * ग्रामपंचायतला कुठलीही पुर्वसुचना लिखित न देता, कार्यालयीन प्रोसेसनुसार परिपत्रक न देता प्रत्यक्ष गावात येवुन सुनावणी करण्यात आली वास्तविक कायद्याच्या दृष्टीने चूकीचे आहे. हे गावक- यांनी नामंजुर केले. *भुमिअधिग्रहन हे कोणत्या वर्षीच्या कायद्यानुसार करण्यात येईल हे सांगण्यात आले नाही.जमिनिची खरेदी विक्री ही wCL मार्फत करण्यात येणार का? किंवा MDO मार्फत प्राव्हेटीकरणाने करणार काय? हे सांगण्यात आले नसल्यामुळे गावकरी व्दिधा मनस्थीतीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी असे ठरविले आहे कि, जमिनिचा मोबदला म्हणुन ५० लाख रु प्रती एकर व प्रती सातबारा एक नौकरी देण्यात यावी तरच आम्ही गावकरी शासनाला जमिन देवु असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

वेकोलि मध्ये नौकरी देत असतांनी कुठलाही बेरोजगार WCL च्या नियुक्ती आदेशावरच WCL मध्ये नियुक्त करावा, कोणत्याही खासगी कंपणी मार्फत देण्यात येणा-या नियुक्ती पत्रावर नौकरीवर रुजु होणार नाही. गावाची १००% शेतीचे अधिग्रहन करण्यात यावे व गावच्या सिमालगत असणा-या गावातील रहिवासी शेतक-यांची शेती अधिग्रहीत करण्यात यावी. ठराव सर्वानुमते मंजूर भुमीहीन शेतक-यांना संबधित अधिका-याने २०००/- रु प्रती महिना देणार असे सांगण्यात आले होते हे समस्त गावक-यांना नामंजुर आहे. ठराव सर्वानुमते मंजुर. वेकोलि मध्ये गावाचे पुनर्वसन असल्यामुळे व गावातील भुमिहीन शेतमजुर हे शेतीवर अवलंबुन असल्यामुळे ते बेरोजगार होणार आहे. तरी अशा सर्व कुटुंबातील बेरोजगार व्यक्तीला पुर्नवसन करीत असतांना नौकरी मध्ये समाविष्ट करण्यात यावे. नुसार चर्चा करण्यात आली व यात असे ठरविण्यात आले कि, मौजा चालबडी(को) येथिल मुळ वास्तव्यात असलेल्या शेतक-यांना नौकरीत प्रथम प्राधान्य देण्यात येवून रुजु करावे व स्थानिक प्रकल्पातच नौकरी देण्यात यावी. असे ठराव सर्वानुमते मंजुर आले व या ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी व वेकोलि महा प्रबंधक यांच्याकडे पाठविण्यात आल्या. जर कंपनीने ग्रामसभेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर वेकोलीची खदान सुरू होऊ देणार नाही असा इशारा पण गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here